agriculture news in marathi Nine and a half lakh tonnes of sugarcane crushed in Parbhani, Hingoli district | Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेनऊ लाख टनांवर उसाचे गाळप

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी सोमवार (ता.१४) पर्यंत ९ लाख ६१ हजार ९५८ टन उसाचे गाळप केले.

परभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी सोमवार (ता.१४) पर्यंत ९ लाख ६१ हजार ९५८ टन उसाचे गाळप केले. त्यांनी एकूण ७ लाख ९९ हजार ३० क्विंटल साखर उत्पादन घेतले.

परभणी जिल्ह्यातील सर्व सहा खासगी साखर  कारखान्यांचे ऊस गाळप सुरु आहे. कानडेखेड (ता.पूर्णा) येथील बळिराजा शुगर कारखान्याने १ लाख ६९ हजार ५५० टन ऊस गाळप, तर ९.४ टक्के उताऱ्याने ६९ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन, देवनांद्रा (ता.पाथरी) येथील रेणुका शुगर कारखान्याने ६७ हजार ४२० टन उसाचे गाळप, तर ८.१७ टक्के  उताऱ्याने ५५ हजार ६६ क्विंटल साखर उत्पादन घेतले. लिंबा (ता.पाथरी) येथील योगेश्वरी शुगर्सने ४१ हजार ५२ टन ऊस गाळप केला. ७.१४ टक्के उताऱ्याने २९ हजार ३२० क्विंटल साखर काढली. 

आमडापूर (ता.परभणी) येथील त्रिधारा शुगर्सने १ लाख १० हजार २२० टन ऊस गाळप केले. ७.९३ टक्के उताऱ्याने ८७ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सायखेडा (ता.सोनपेठ) येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याने १ लाख ३८ हजार २५ टन गाळप, तर ९९ हजार ४५०  क्विंटल साखर उत्पादन, माखणी (ता.गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर कारखान्याने ३४ हजार ३१० टन गाळप, १९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. एकूण सहा कारखान्यांनी ५ लाख ९२ हजार ९९७ टन गाळप केले. सरासरी ८.०१ टक्के उताऱ्याने ४ लाख ७५ हजार ३० क्विंटल साखर काढली. 

हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता.कळमनुरी) येथील भाऊराव चव्हाण कारखाना युनिट दोनने ६२ हजार ६२० टन गाळप, तर ५१ हजार ५५० क्विंटल साखर, वसमत येथील पूर्णा कारखान्याने १ लाख ९९० टन गाळप, १ लाख ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.

जवळा बाजार (ता.औंढा नागनाथ) येथील पूर्णा कारखाना युनिट दोन (बाराशिव हनुमान) ने ९३ हजार ७० टन गाळप, ८० हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन, शिरूर शुगर्सने १ लाख १ हजार २२१ टन गाळप, तर ९१ हजार ३५० क्विंटल साखर काढली. 

हिंगोलीत ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन 

कुरुंदा (ता.वसमत) येथील टोकाई कारखान्याने २ हजार ६० टन ऊस गाळप केले. हिंगोली जिल्ह्यातील चार सहकारी साखर आणि एका खासगी कारखान्यांनी एकूण ३ लाख ६८ हजार ९६१ टन उसाचे  गाळप केले. सरासरी ८.७८ टक्के उताऱ्याने ३ लाख २४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...