अकोला : इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या
ताज्या घडामोडी
विजेच्या धक्क्याने नऊ गायींचा मृत्यू
संगमनेर : तालुक्यातील कनोली येथे घर व गोठ्याच्या शेडवरून गेलेली उच्चदाब वीजवाहक तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर कोसळली. या घटनेत सात मोठ्या दुभत्या व गाभण गायी, एक गावठी गाय व एका कालवडीचा मृत्यू झाला. नानासाहेब वर्पे यांच्या वस्तीवर शनिवारी (ता. ९) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना झाली.

वर्पे यांच्या घराजवळ गोठ्याचे शेड आहे. त्यावरून कॅनोलीची ११ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी गेली आहे. पहाटे साडेचारच्या सुमारास स्फोटासारखा आवाज आल्याने जागे झालेल्या वर्पे कुटुंबीयांना गोठ्याच्या पत्र्यावर वीज तार पडल्याचे, गवत व कापड पेटल्याचे दिसले. लोखंडी पत्रा, अँगल, गव्हाणी व गळ्यातील साखळ्यांमुळे गोठ्यातील गायींचा विजेच्या धक्क्यामुळे जागीच मृत्यू झाला.
वर्पे यांनी माहिती दिल्यानंतर उपकेंद्रातून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. गोठ्यावरून गेलेल्या वीजवाहिनीचे शिफ्टिंग करण्यासाठी महावितरणच्या आश्वी बुद्रुक कार्यालयात पूर्वीच अर्ज दिल्याचे वर्पे यांनी सांगितले. सुमारे आठ लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. आश्वी पोलिस ठाण्याचे कैलास ठोंबरे, तलाठी सुहास नागरे, पोलिस पाटील नानासाहेब वर्पे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे यांनी पंचनामा केला.
महावितरणचे सहायक अभियंता योगेश सोनवणे म्हणाले, ‘‘विजेच्या खांबावरील ब्रॅकेट तुटून स्पार्किंग झाल्याने तार तुटली. टाकलेल्या असल्याने जुन्या झाल्या आहेत.‘‘
- 1 of 1063
- ››