Agriculture news in Marathi Nine hundred complaints of farmers for debt relief in Yavatmal district | Page 2 ||| Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांच्या नऊशे तक्रारी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 जुलै 2020

यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबत तक्रारीची संख्याही वाढत आहे. या तक्रारी जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवल्या जाणार असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ : महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासोबत तक्रारीची संख्याही वाढत आहे. आधार क्रमांक बदलणे, वारसाची नोंदणी, पुनर्गठन करताना सही नसणे, कर्जमाफीची रक्कम अशा स्वरूपाच्या जवळपास तक्रारी सहकार विभागाकडे आल्या आहेत. या तक्रारी जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवल्या जाणार असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. त्याचा परिणाम राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेवरही झाला आहे. अनेक महिन्यांपासून घोषणा होऊनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. आता ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय कामांनाही गती मिळाली आहे. कर्जमाफी योजनेचे काम सुरू झाले आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू झाले आहे. यासोबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची संख्याही वाढत आहे.

कर्जमाफी संदर्भात आत्तापर्यंत जिल्हाभरातून आठशेच्यावर शेतकऱ्यांनी सहकार विभागाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बदलले आहेत. काहींच्या अर्जावर वारसाचे नाव नाही, तर ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले, अशांची सही त्यासाठी नाही. याशिवाय, काहींच्या रक्कमेत तफावत आहे. अशा नानाविध प्रकारच्या तक्रारी सहकार विभागाकडे येत आहेत. कर्जमुक्तीसाठी प्रमाणीकरणाचे काम वेगात सुरू आहे.

सद्यःस्थितीत केवळ नऊ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मदतीला सुरुवात होणार आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. अशांची सुनावणी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीसमोर होणार आहे. याठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना पुराव्यानिशी आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर दुरुस्ती होऊन संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. लवकरच जिल्हास्तरीय समितीची बैठक होणार असून कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

जिल्हा बँकेची प्रक्रिया
सुरू होण्याची शक्यता

जिल्ह्याला ७४५ कोटींची कर्जमाफी झाली आहे. यातील ७१० कोटींचा निधी दिला जाणार आहे. सध्या जिल्ह्याला ३८९ कोटी रुपये प्राप्त झाले आहे.  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दिले आहेत. जिल्हा बँकेची प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित रक्कम इतर बँकांची असून त्यांची प्रक्रियाही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या घडामोडी
अधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष...सध्याच्या परिस्थितीत द्राक्ष बागेत पाऊस व पावसाळी...
जमीन सुपिकतेसाठी कंपोस्ट खत निर्मितीकंपोस्ट खताचा उपयोग जमिनीत केल्यास जमिनीत पूर्वी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...