नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख अर्ज

नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२१-२२ साठी ९ लाख १ हजार ४२० अर्ज सहा पिकांसाठी दाखल केले आहेत.
Nine lakh applications under crop insurance scheme in Nanded district
Nine lakh applications under crop insurance scheme in Nanded district

नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२१-२२ साठी ९ लाख १ हजार ४२० अर्ज सहा पिकांसाठी दाखल केले आहेत. या शेतकऱ्यांनी ४४ कोटी ३९ लाख ५३ हजार २३६ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. विमा योजनेत पाच लाख १३ हजार अठरा हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केले आहे.

जिल्ह्यात इफ्को टोकीयो कंपनीची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, ज्वारी व कपाशी या पिकासाठी पीक विमा भरला. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. यात सोयाबीनसाठी पाच लाख ८५ हजार ७०४ अर्ज दाखल झाले आहेत.

तर मुगासाठी एक लाख सहा हजार ८७६, उडीद ९८ हजार १२२, तूर ४४ हजार ६१७, ज्वारी ३४ हजार २१४ व कपाशी ३१ हजार ८८७ अर्ज दाखल झाले आहेत. मागीलवर्षीही जिल्ह्यातील नऊ लाख ५३ हजार अर्जदार शेतकऱ्यांनी ४४ कोटी ४५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यात एक लाख २१ हजार ६०२ अर्जदारांना ९७ कोटी ९१ लाखांचा विमा मंजूर झाला होता.

शेतकऱ्यांसह शासनाचा विमा हप्ता ६३० कोटी

पीकविम्यापोटी राज्य व केंद्र शासनाकडून अनुक्रमे २९३ कोटी सहा लाख ४६ हजार ६६१ रुपये असे ५८६ कोटी १२ लाख ९३ हजार ३२२ रुपये व शेतकरी हिस्सा ४४ कोटी ३९ लाख ५३ हजार २६३ रुपये असे एकूण ६३० कोटी ५२ लाख ४६ हजार ५८५ रुपये जमा होणार आहेत. या योजनेत शेतकऱ्यांची जोखीम रक्कम २१४५ कोटी ८० लाख ६८ हजार ४७१ रुपये निर्धारित केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com