एकोणीस लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यांत दुष्काळ निधी जमा 

एकोणीस लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यांत दुष्काळ निधी जमा
एकोणीस लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यांत दुष्काळ निधी जमा

औरंगाबाद : खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून निधी वाटपाचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार शासनाकडून पहिल्या व दुसऱ्या हप्त्यात प्राप्त निधीपैकी १९ लाख ३९ हजार ३०१ शेतकऱ्यांच्या खात्यांवर मदतीची रक्‍कम जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या १५१ तालुक्‍यांतील गावांमध्ये मराठवाड्यातील ५५१७ गावांचा समावेश आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना खरीप २०१८ साठी दुष्काळ निधी वाटपासाठी सुरवातीला याद्या तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतले होते. २३ फेब्रुवारीअखेरपर्यंत ४६२४ गावांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या. या याद्यानुसार ३१ लाख ४३ हजार ५४२ शेतकऱ्यांची नावे लाभार्थी म्हणून समोर आली होती. 

त्यामधील २३ लाख ९ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या याद्या अंतिमत: तयार झाल्या होत्या. तयार झालेल्या याद्यांपैकी १९ लाख ३९ हजार ३०१ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर २३ फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रत्यक्ष मदत जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जमा झालेल्या दुष्काळ निधीची रक्‍कम ६५६९९.७३ लाख रुपये इतकी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. शासनाकडून खरीप २०१८ दुष्काळी निधी वाटपासाठी १०५०५८.६८ लाख रुपये विभागाला प्राप्त झाले होते. 

प्राप्त झालेल्या निधीपैकी नांदेड, लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ निधी वितरणाचे काम झाले. तर त्यापाठोपाठ परभणी, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, बीड आदी जिल्ह्यांचा क्रमांक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ५० टक्‍केच दुष्काळ निधी वाटपाचे काम आटोपले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com