चंद्रपूर जिल्ह्यात नऊ धान खरेदी केंद्रांना पहिल्यांदाच मान्यता

Nine paddy procurement centers in Chandrapur district approved for the first time
Nine paddy procurement centers in Chandrapur district approved for the first time

चंद्रपूर ः जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच धान खरेदीसाठी आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार तब्बल ९ केंद्र पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांच्या धानाला वाढीव दर मिळण्यास मदत होणार आहे. 

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पावसामुळे धानाचे बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. परंतू बाजारात धानाची आवक वाढताच दर गडगडले. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आदिवासी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होती. त्याची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव, अडेगाव, डोमा, खांबाडा, बोडधा, जांभूळघाट, मोरेगाव, भटाळा, चंदनखेडा या नऊ संस्थांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. 

भद्रावती, चिमूर, वरोरा या तालुक्‍यातील या संस्था आहेत. शासनाने उच्च प्रतीच्या धानासाठी १८३५ रुपये तर हलक्‍या धानासाठी १ हजार ८१५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. प्रतिक्‍विंटल ५०० रुपयांचे बोनस त्यासोबतच २०० रुपये अतिरिक्‍त याप्रमाणे ७०० रुपये वाढीव मिळतील. या अनुदानाचा फायदा धान उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. परंतू खरेदी संदर्भाने असलेल्या काही अटींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

गावातच होणार खरेदी आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात जी गावे येतात, त्याच गावातील शेतकऱ्यांची सोसायटी हमीभावाने धान खरेदी करणार आहे. सोसायटीअंतर्गत नसलेल्या गावातील धान खरेदी केली जाणार नाही. त्यामुळे ही अट शिथिल करावी, अशी मागणी बाजार समिती संचालक योगेश खामणकर यांनी शासनाकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com