agriculture news in marathi Nine thousand farmers Debt forgiveness stalled | Agrowon

परभणी, हिंगोलीत नऊ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 ऑगस्ट 2021

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९ हजारांवर कर्जखात्यांच्या आधार प्रमाणीकरणाअभावी कर्जमाफी रखडली आहे.

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ७७८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर १ हजार ७१८ कोटी ७५ लाख रुपये रक्कम हस्तांतरित करण्यात आली. परंतु दोन जिल्ह्यातील ९ हजारांवर कर्जखात्यांच्या आधार प्रमाणीकरणाअभावी कर्जमाफी रखडली आहे.

परभणी जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत पोर्टलवर २ लाख ९ हजार १०८ कर्जखाती अपलोड करण्यात आली. आजवर एकुण १ हजार ९० हजार ८१० कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला आहे. जुलै अखेरपर्यंत १ लाख ८४ हजार ७९५ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. परंतु ६ हजार ८ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे. एकूण १ लाख ८० हजार ३१२ कर्जखात्यांवर १ हजार १२३ कोटी ८८ लाख रुपये  रक्कम हस्तांतरित करण्यात आली. ३ हजार ५०  कर्जखात्यांबाबत तक्रारी  आहेत.

जिल्हा स्तरीय समितीतर्फे १ हजार ५८२ खात्याबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले. २६ तक्रारी प्रलंबित आहेत. तालुका स्तरीय समितीकडून १ हजार ४११ तक्रारींचे निवारण करण्यात आले. ३१ तक्रारी प्रलंबित आहेत.

हिंगोली जिल्ह्यात १ लाख २ हजार ४१० कर्जखाती  पोर्टंलवर अपलोड करण्यात आली. आजवर एकुण ९६ हजार ९६ कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला. जुलै अखेरपर्यंत ९३ हजार ५२ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. तर ३ हजार ४३ कर्जखात्यांचे आधारप्रमाणीकरण शिल्लक आहे. आजवर ९१ हजार ४६६ कर्जखात्यांवर ५९४ कोटी ८७ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले.

टॅग्स

इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...