सांगलीतील नऊ हजार  ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडल्या 

वीज थकबाकी व कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणीतील महावितरण कंपनीने थकबाकीदारांच्या वीजजोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली आहे.
सांगलीतील नऊ हजार  ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडल्या  Nine thousand in Sangli Customer power outages
सांगलीतील नऊ हजार  ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडल्या  Nine thousand in Sangli Customer power outages

सांगली : वीज थकबाकी व कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणीतील महावितरण कंपनीने थकबाकीदारांच्या वीजजोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात मागील पंधरवड्यात १ एक लाख ३ हजार थकबाकीदारांच्या वीजजोडण्या तोडल्या आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील ९३१३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. कृषी ग्राहक वगळता इतर ग्राहकांचा त्यामध्ये समावेश आहे. 

कोरोनाच्या काळात महावितरणसमोर थकबाकी वसुलीचे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. महावितरणमधील सर्व कर्मचारी संघटनांची काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन वसुलीसाठी त्यांना सूचना दिल्या. संघटनांनी देखील शंभर टक्के वसुलीचा निर्धार केला आहे. तसेच दुसरीकडे थकबाकीदारांच्या वीज जोडण्या तोडण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यावरही वीज वापरल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. धडक मोहिमेत वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाची वीज जोडणी पुन्हा सुरू केली नाही ना? याची पथकांमार्फत पडताळणी केली जाते. सायंकाळनंतर विशेष तपासणी केली जाते. शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर आढळल्यास शेजारी व वीज वापरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध ‘भारतीय विद्युत कायदा २००३’च्या कलम १३५/१३८ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती? हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.  सांगली जिल्ह्यात मागील पंधरवड्यात ९ हजार ३१३ थकबाकीदारांच्या वीजजोडण्या तोडल्या आहेत. जिल्ह्यातील कृषी ग्राहक वगळता इतर ग्राहकांची थकबाकी २२६ कोटी रुपये आहे. थकबाकीदारांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुट्टीच्या महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवली आहेत. ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करून सहकार्य करावे. ऑनलाइनचाही वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.  पावणेतीन लाख ग्राहक थकबाकीत  कृषी ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर अशा जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार ९५० ग्राहकांकडील थकबाकी २२६ कोटी रुपये आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनंतर सांगली जिल्ह्याचा थकबाकीत शेवटचा क्रमांक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com