अक्कलकोट : पाण्यासाठी नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

पाण्यासाठी अक्कलकोट तालुक्‍यातील  नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार
पाण्यासाठी अक्कलकोट तालुक्‍यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडावे, अशी मागणी करुनही ते पाणी पुढे न सोडल्याने अक्कलकोट तालुक्‍यातील या भागातील जवळपास २२ गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या गावांपैकी आळगी, कलकर्जाळ, आंदेवाडी, कुडल, म्हैसलगी, हिळ्ळी, शावळ, खानापूर व गुड्डेवाडी ९ गावांनी आता थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, तशी माहिती या गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१५) पत्रकार परिषद घेऊन सांगितली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामदू पटेल, इक्‍बाल मुजावर, उमाशंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली या गावांचे काही सरपंच आणि सदस्यांसह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तशी मागणीही केली. पण निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली ते मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे पटेल म्हणाले.

दरम्यान, अंबण्णा विजापुरे (अंकलगी), कुंडलिक पुजारी (कुडल), शिवानंद देवणगाव (खानापूर), महांतेश हत्तुरे (आळगी) आणि यासिन कुमटे (आळगी), राजशेखर सावळगी (आंदेवाडी), बी.टी. पुजारी (शावळ), तुकाराम पुजारी (हिळ्ळी) यांनी आपल्या भागातील पाण्याची परिस्थिती मांडली. दोनच दिवसापूर्वी या भागातील शेतकऱ्यानी आक्रमक होत, या प्रश्‍नावर आंदोलनाचा इशारा दिला होता.

आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्‍नी सकारात्मक तोडगा काढून देण्याचे आश्‍वासन दिले होते. पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. अखेरीस शेतकरयांनीच सोमवारी एकत्रित येत, थेट लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचा ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला देऊन आपली नाराजी व्यक्त केली.

सध्या बरुरच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडले आहे. पुढे फक्त तीन बंधारे आहेत. यापूर्वी सातत्याने असाच अन्याय आमच्या भागावर झाला आहे. प्रत्येकवेळी आश्‍वासन मिळते, पण कार्यवाही काही होत नाही, याकडेही या शेतकऱ्यांनी लक्ष वेधले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com