रत्नागिरीतील नऊ गावे होणार ‘सेंद्रिय’

रत्नागिरीतील नऊ गावे होणार ‘सेंद्रिय’
रत्नागिरीतील नऊ गावे होणार ‘सेंद्रिय’

रत्नागिरी : महाराष्ट्रात सेंद्रिय गावे निर्माण करण्याचा प्रयोग रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. ‘जैविक ग्राम समृद्धी’ योजनेत सहभागी जिल्ह्यातील नऊ गावांत शंभर टक्के कामांची पूर्तता झाली. त्यामुळे अपेडांतर्गत पहिल्या वर्षातील प्रमाणिकरणाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे.

जैविक ग्राम समृध्दी योजनेतंर्गत प्रत्येक सेंद्रिय गावाला एक लाख रुपयाचा निधी दिला गेला होता. या निधीतून गावामध्ये ५० हजार रुपयांचे काडीकचरा बारीक करणारे यंत्र घेण्यात आले. त्याद्वारे काडीकचरा एकत्र करून तो व्यवस्थित बारीक करण्यात येत आहे. याशिवाय शासकीय योजनेतूतन शोषखड्डे, नॅडेप, गांडूळखत युनिट घरोघरी तयार करण्यात आले. पहिलेच वर्ष असतानाही गावात भात, नाचणी, उडीद, भाजीपाला शेती शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने करण्यात आली. त्यामुळे नऊ गावांच्या सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणीकरण ‘ग्रीनसर्ट’ कंपनी करणार आहे. 

खानू (रत्नागिरी), विवली (लांजा), पालये (मंडणगड), मोरवणे (चिपळूण), गोवळ (राजापूर), पाभरे (गुहागर), अनासपुरे (खेड), वीरसई (दापोली), सरंद (संगमेश्वर) या गावांची निवड जैविक ग्राम समृध्दी योजनेसाठी करण्यात आली आहे. शोषखड्डा/नॅडेप, गांडूळखत प्रकल्पाची कामे पूर्ण झाली आहेत. नऊ गावांतील उत्पादित सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणिकरण तृतीय प्रमाणिकरण संस्थेकडून (थर्ड पार्टी) केले आहे. उत्पादित शेतमालाचे मार्केटिंगदेखील केले जाणार आहे. 

सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ती देखरेखीचे काम पाहात आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर गावात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून गांडूळखत प्रकल्प, घर तेथे शोषखड्डा/नॅडेपसारख्या कामातून योजना अधिक सुदृढ केली आहे. सेंद्रिय शेतीमुळे खर्चात घट आणि उत्पन्नात वाढ होईल. सेंद्रिय शेतमाल प्रमाणिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादन घेता येईल. 

प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक गुरूदत्त काळे म्हणाले, ‘‘रासायनिक खताच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, जमिनीतील पोषक घटकांचे घटते प्रमाण, यामुळे शेतकरीदेखील सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. त्यासाठी ग्रामसभेत सेंद्रिय गावाचा ठराव करून रासायनिक खतांचा वापर १०० टक्के न करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com