नांदेडमधील १०९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

नांदेडमधील १०९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी
नांदेडमधील १०९४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

नांदेड ः जिल्ह्याची यंदाच्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ५१.३१ पैसे आली आहे. जिल्ह्यातील १६ पैकी १० तालुक्यांतील १ हजार ९४ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे, तर ६ तालुक्यांतील ४६८ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आली आहे.

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिपाची अंतिम पैसेवारी शनिवारी (ता. १५) नांदेड तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट १३ गावे वगळता जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील १ हजार ५६२ गावांची यंदाच्या खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यात लागवडी योग्य क्षेत्र ८ लाख २५ हजार ५०८ हेक्टर आहे. यंदा ७ लाख ७७ हजार ८८५ हेक्टवर पेरणी झाली होती. ३३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र पडिक राहिले होते. 

नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर या ६ तालुक्यांतील ४६८ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आली आहे. कंधार, लोहा, किनवट, माहूर, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी या १० तालुक्यांतील १ हजार ९४ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे. 

दरम्यान, जिल्ह्याची खरिपाची सुधारित पैसेवारी सरासरी ५४.६२ पैसे आली होती. त्या वेळी तीन तालुक्यांतील ३०५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी, १३ तालुक्यांतील १ हजार २५७ गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक आली होती. गंभीर दुष्काळामुळे अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी आलेल्या गावांची संख्या १ हजार ९४ पर्यंत वाढली आहे.

तालुकानिहाय खरीप अंतिम पैसेवारी
तालुका गावाची संख्या पैसेवारी पेरणी क्षेत्र पडिक क्षेत्र 
नांदेड ८८ ५४ २४९२४ ८०९७
अर्धापूर ५६  ६२ २२६६५ ३३२
कंधार १२६ ४९ ६६११ ३१९७
लोहा १२७ ४८ ७३८६७ ७४०२
भोकर ७७ ५४ ४८४९८ ७२
मुदखेड ५५ ६५ २०२२० ६९
हदगाव १४५ ५२ ८३१८९ ४३४६
हिमायतनगर ६४ ५६ ०५२१
किनवट १९१ ४८ ३७४६ २०९९
माहूर ९२ ४९ १४६८ २४६७
देगलूर १०८ ४६ ५७४३९ १३७४
मुखेड १३५ ४५ ७४१४ ४५०
बिलोली ९१ ४९ ४५८८० १९०९
नायगाव ८९ ४८ ४६४६८ ६७८
धर्माबाद ५६ ४९ २९७०० ७१८
उमरी ६२ ४७ ३४८७४ २२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com