Agriculture news in marathi, Ninety nine thousand farmers apply for solar agricultural pumps in Nagar district | Page 3 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात सव्वानऊ हजार शेतकऱ्यांचे सौर कृषिपंपांसाठी अर्ज

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 ऑक्टोबर 2021

नगर : जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६३५ शेतकऱ्यांनी विहिरींवर सौरऊर्जा पॅनेल बसविले आहेत. त्यामुळे भारनियमनातून त्यांची सुटका झाली आहे. ते विजेबाबत आत्मनिर्भर झाले आहेत. 

नगर : जिल्ह्यात तब्बल दोन हजार ६३५ शेतकऱ्यांनी विहिरींवर सौरऊर्जा पॅनेल बसविले आहेत. त्यामुळे भारनियमनातून त्यांची सुटका झाली आहे. ते विजेबाबत आत्मनिर्भर झाले आहेत. आता जिल्ह्यातून तब्बल नऊ हजार २९२ शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. 

सततची दुष्काळी पूरस्थिती, खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालावर मोठा परिणाम होतो. यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे जमिनीची पाणी पातळी वाढली आहे. रब्बीसाठी पाणी उपलब्ध असले, तरी वीजपुरवठा सुरळीत राहील, याची शाश्‍वती नसते. बहुतांश भागातील रोहित्र जळाल्यानंतर महिना-दोन महिने अनेक कारणांमुळे ते मिळत नाहीत.

थकबाकी वाढल्याने वीजपुरवठा खंडित केला जातो. भारनियमनाचा सामना करावा लागतो. राज्य सरकारने या अडचणीतून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू केली. या योजनेतून पंप बसविण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार २९२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यातील तीन हजार २८ प्रकरणे मंजूर झाली. ९५० प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने चार हजार ८९३ प्रकरणे नामंजूर झाली आहेत. 

३०२७ शेतकऱ्यांनी भरले पैसे 

मुख्यमंत्री सौरऊर्जा पंप योजनेअंतर्गत ३०२७ शेतकऱ्यांनी सौरऊर्जा पंपांसाठी ऑनलाइन अर्ज करून पैसे भरले आहेत. टप्प्याटप्याने पंप वाटप केले जात आहेत. तीन एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभधारकास १० टक्के म्हणजे १६ हजार ८८० रुपये भरावे लागतात. मागासवर्गीय व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरावी लागते.

शेतात सौरऊर्जा पंप बसविला आहे. पाणीटंचाई वगळता इतर काळात सकाळपासून सायंकाळपर्यंत पंपाद्वारे पिकांना पाणी दिले. त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत झाली. आता भारनियमनातून मुक्तता झाली आहे.
- कांतिलाल खाटीक, पाथरवाले, ता. नेवासे. 


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...