नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून नाशिक येथे प्रारंभ

नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून नाशिक येथे प्रारंभ
नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून नाशिक येथे प्रारंभ

नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी यांच्या वतीने 'जागतिक कृषी महोत्सव'ला गुरुवार (ता. २३) पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे व श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी सांगितले.  गुरुवारी (ता. २३) उद्‍घाटनाच्या दिवशी दुपारी ०२ वा. ''विषमुक्त शाश्वत शेती व विकास'' या विषयावर राजेंद्र भट व जपान येथील सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. तेउरा मेउरा यांचे मार्गदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २४) युवकांसाठी ''कृषी स्वयंरोजगार'' महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगार युवकांना''कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी''या विषयावर प्रा. नामदेव जाधव, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे, उद्योजक शरद तांदळे यांचे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (ता. २५) आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त, कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलींसाठी मोफत कन्यादान व भव्य शेतकरी वधु-वर परिचय मेळाव्याचे विवाहसंस्कार विभागातर्फे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २६)''इतिहास अभ्यासक व पर्यावरण'' यावर दुर्गसंवर्धन अभियानांतर्गत प्रमोद बोऱ्हाडे यांचे मार्गदर्शन होईल, तर दुपारी २ वाजता ''बांबू व त्यावरील उद्योग व्यवसाय''विषयी अभ्यासक संजीव कर्पे यांचे मार्गदर्शन होणार आहे. सोमवारी (ता. २७) ‘बारा बलुतेदार एक आदर्श गाव’च्या माध्यमातून आदर्श गावावर आधारित सरपंच व ग्रामसेवक मंदियाळीचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवास प्रवेश विनामूल्य असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com