agriculture news in Marathi ninth international agriculture festival from tomorrow Maharashtra | Agrowon

नवव्या जागतिक कृषी महोत्सवास उद्यापासून नाशिक येथे प्रारंभ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी यांच्या वतीने 'जागतिक कृषी महोत्सव'ला गुरुवार (ता. २३) पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे व श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी सांगितले. 

नाशिक : श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी यांच्या वतीने 'जागतिक कृषी महोत्सव'ला गुरुवार (ता. २३) पासून प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे व श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी सांगितले. 

गुरुवारी (ता. २३) उद्‍घाटनाच्या दिवशी दुपारी ०२ वा. ''विषमुक्त शाश्वत शेती व विकास'' या विषयावर राजेंद्र भट व जपान येथील सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. तेउरा मेउरा यांचे मार्गदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २४) युवकांसाठी ''कृषी स्वयंरोजगार'' महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बेरोजगार युवकांना''कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी''या विषयावर प्रा. नामदेव जाधव, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे, उद्योजक शरद तांदळे यांचे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी (ता. २५) आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त, कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलींसाठी मोफत कन्यादान व भव्य शेतकरी वधु-वर परिचय मेळाव्याचे विवाहसंस्कार विभागातर्फे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी (ता. २६)''इतिहास अभ्यासक व पर्यावरण'' यावर दुर्गसंवर्धन अभियानांतर्गत प्रमोद बोऱ्हाडे यांचे मार्गदर्शन होईल, तर दुपारी २ वाजता ''बांबू व त्यावरील उद्योग व्यवसाय''विषयी अभ्यासक संजीव कर्पे यांचे मार्गदर्शन होणार आहे. सोमवारी (ता. २७) ‘बारा बलुतेदार एक आदर्श गाव’च्या माध्यमातून आदर्श गावावर आधारित सरपंच व ग्रामसेवक मंदियाळीचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवास प्रवेश विनामूल्य असणार आहे.


इतर बातम्या
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...