निफाड तालुक्यात वाऱ्यासह गारपिटीचा द्राक्ष बागांना तडाखा

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (ता.६) दुपारनंतर निफाड, चांदवड, दिंडोरी, मालेगाव तालुक्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. निफाड तालुक्यातील उत्तर भागात गारपिटीसह वादळी पावसामुळे छाटलेल्या द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले.
In Niphad taluka, hailstorms hit vineyards with wind
In Niphad taluka, hailstorms hit vineyards with wind

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (ता.६) दुपारनंतर निफाड, चांदवड, दिंडोरी, मालेगाव तालुक्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. निफाड तालुक्यातील उत्तर भागात गारपिटीसह वादळी पावसामुळे छाटलेल्या द्राक्षबागांचे अतोनात नुकसान झाले.

सप्टेंबरच्या अखेरीस जिल्ह्याच्या द्राक्ष उत्पादक पट्ट्यात गोडी बहर छाटण्यांना वेग आला आहे. त्यामुळे छाटणी अवस्थेनंतर फुटवा अवस्थेतील बागांमध्ये सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्यातच झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे नुकसानीत अजून भर पडली आहे. गारपिटीने काही भागातील द्राक्षवेलींवरील नविन फुटवा काही क्षणात गळून पडला. लाखो रुपयाचा खर्च करून तयार केलेल्या झाडांकडून दोन पैसे मिळतील हे स्वप्न अस्मानी संकटाने पुन्हा एकदा हिरावून घेतले. 

ज्या बागा पोंगा ते फुलोरा अवस्थेत होत्या, त्यात घड तुटले. पाने व तयार झालेल्या फुटी, काड्या यांना इजा झाली. यामध्ये छाटणीपश्चात वाढीच्या अवस्थेत असलेले घडांचे मोठे नुकसान आहे. गारांच्या माऱ्यात पाने तुटून पडली. अन्ननिर्मितीत समस्या निर्माण होणार आहेत. 

आमच्या भागातील ४० टक्के बागा छाटल्या गेल्या होत्या. त्या फुटव्यानंतर वाढीच्या अवस्थेत होत्या. गारपिटीमुळे मोठे नुकसान वाढले आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन पीक संरक्षण खर्चात मोठी वाढ होईल. त्यामुळे अस्मानी, कोरोना आणि आता पुन्हा अस्मानी अशी कोंडी झाली आहे. - संदीप घंगाळे, द्राक्ष उत्पादक, कुंभारी, ता. निफाड.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com