अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी दिल्ल
बातम्या
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची स्वच्छता करा
सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा भाटघरच्या कॅनॉलची तातडीने स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, अन्यथा दोन मार्चला अनवली चौकात रास्ता-रोको करण्यात येईल’’, असा इशारा युवक कॅांग्रेसने दिला.
सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा भाटघरच्या कॅनॉलची तातडीने स्वच्छता आणि दुरुस्ती करावी, अन्यथा दोन मार्चला अनवली चौकात रास्ता-रोको करण्यात येईल’’, असा इशारा युवक कॅांग्रेसने दिला.
पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा भाटघरच्या कॅनॉलमध्ये (पानतास नळी ते हरिजन फाटा व जगताप फाटा) मोठ्या प्रमाणात झाडं आली आहेत. अतिवृष्टीमुळे कॅनॉल खराब झाल्याने उन्हाळी हंगामातील पाण्याची पाळी मिळण्यास अडचणीचे झाले आहे. तरी या नीरा भाटघरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घ्यावी, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, सध्या अनेक भागात शेतकऱ्यांचा कल उन्हाळी पिकांकडे आहे. त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. परंतु कॅनॅालची ही अवस्था असल्याने पाणी मिळण्यात अडचण येणार आहे. याबाबत तातडीने दखल घ्या, अन्यथा युवक कॉंग्रेसला आंदोलनाशिवाय पर्याय असणार नाही, असेही पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांनी निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे, तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, उपाध्यक्ष कृष्णा कवडे, उमेश शिंदे, श्रीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
- 1 of 1537
- ››