नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटप

Nira Deodhar, Equal water sharing through resonance
Nira Deodhar, Equal water sharing through resonance

मुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नीरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषिपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत बारामती-इंदापूरला जाणारे जादा पाणी बंद करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने फिरविला आहे. पाणीवाटपावरून पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये तसेच राजकीय पक्षांमध्ये निर्माण होणाऱ्या वादावर तोडगा काढताना या दोन्ही धरणातील शिल्लक पाण्याचे नीरा डावा आणि उजव्या कालव्यातून अनुक्रमे ५५ आणि ४५ टक्के असे समन्यायी पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचा फायदा बारामतीसह इंदापूर, पुरंदर तालुक्यांना होणार आहे.

नीरा देवघर धरणाचे काम सन -२००७ मध्ये पूर्ण झाले असून ११.७३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे व गुंजवणी धरणात सन २०१८ पासून ३.६९ टीएमसी पाणीसाठानिर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालवा यात समन्यायी तत्त्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पूर्वी या धरणामधील पाण्याचे वाटप करताना डाव्या कालव्यातून ५७ टक्के तर उजव्या कालव्यातून ४३ टक्के पाणी सोडले जात होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पाणीवाटपाच्या सूत्रात बदल करीत डाव्या कालव्यातून ६० टक्के तर उजव्या कालव्यातून ४० टक्के पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा साहजिकच फायदा बारामती तालुक्याला झाला होता. या पाणीवाटपाचा कालावधी ३ एप्रिल २०१७ पर्यंत होता. मात्र ही मुदत वाढविण्याच्या हालचाली सुरू होताच भाजपचे माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना शरद पवार आणि अजित पवारांच्या दबावामुळे बारामतीला देण्यात आलेले वाढीव पाणी बंद करण्याची मागणी करीत आंदोलन केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com