Agriculture news in marathi In the Nira Deoghar dam area Maximum rainfall of 255 mm | Page 2 ||| Agrowon

नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात असलेल्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस पडला. पावसाचा जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांना चांगलाच फटका बसला आहे.

पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात असलेल्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५ मिमी पाऊस पडला. पावसाचा जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांना चांगलाच फटका बसला आहे. मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील १७६ कुटुंबातील ६०० व्यक्तींना स्थलांतर केले. तर सहा जनावरे व एक व्यक्तीचा  वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर ४० घरांचे नुकसान झाले असून, ९५ पोल २ रोहित्रांचे नुकसान झाले आहे.

शनिवारी दिवसभर पावसाने काहीशी उघडीप दिली होती.  
 गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढू लागला होता. मागील तीन ते चार दिवसांत पावसाने चांगलाच कहर केला. प्रामुख्याने पश्चिम भागात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. ताम्हिणी, लोणावळा परिसरात मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत होती.

शनिवारी (ता.२४) सकाळी आठवाजेपर्यत नीरा देवघर २५५, मुळशी २०१ मिलिमीटर पाऊस पडला. तर पानशेत १९३, टेमघर १९०, वरसगाव १८८, वडीवळे १८७, गुंजवणी १७३, कळमोडी १२४, पवना १२०, आंध्रा ९६, भाटघर ९२, भामा आसखेड ८१, कासारसाई ७०, खडकवासला ५८, पिंपळगावे जोगे ३८, चासकमान ३४, वीर २५, नाझरे १६, माणिकडोह २३, डिंभे ३२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहिल्याने धरणात दोन ते तीन टीएमसीपर्यंत पाणीसाठ्यात वाढ झाली. खडकवासला १८,४९९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता.

नदीकाठावर सतर्क राहण्याचे आवाहन 
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस काहीसा कमी झाला आहे. मात्र लगतच्या जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने, त्या धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी, तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी केले आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नगर येथील दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ वा २३५६०४० वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. भीमा नदीत दौंड पूल येथे ६१,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...