नीरा उजव्या कालव्यावरील पिके करपली 

लवंग, जि. सोलापूर ः भाटघर, वीर, नीरा-देवधर ही धरणे यंदा शंभर टक्के भरुन उशिरापर्यंत वाहिली. तरीही कालव्याची वहनक्षमता कमी असल्यामुळे नीरा उजव्या कालव्यावर भिजणाऱ्या पिकांना दुसऱ्या आवर्तनाचे पाणी तब्बल दोन ते अडीच महिने न मिळाल्याने या भागातील पिके करपून गेली आहेत. काही आता करपून जाण्याच्या मार्गावर आहेत. शासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम भोगण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
Nira planted crops on the right canal

पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाचा अभाव, पाणी वाटपासाठी खात्याकडे कर्मचारी कमी, उन्हाळी हंगामाचे पाणी उशिरा चालू करणे, अशा अनेक कारणाने दरवर्षी शेतकऱ्याना उशिरा पाणी मिळते, परंतु यंदा वेळेवर उन्हाळी पाळी चालू करुनही योग्य रित्या पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचू शकले नाही. उन्हाच्या कडाक्यामुळे पिके लवकर पाण्याला आली आहेत आणि त्यात ही समस्या उद्भवली आहे. 

वीर धरणावरुन फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांना जाणाऱ्या उजव्या कालव्याची वहन क्षमता कमी असल्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही दोन-अडीच महिने उशिरा पाणी मिळते. शिवाय पुरेशाप्रमाणात मिळत नाही. शिवाय पाण्याची मागणी वाढली आहे. पूर्वी पाणी मागणीचे क्षेत्र ६५ हजार हेक्टरपर्यंत होते, ते आज २ लाख ४७ हजार हेक्टरपर्यंत पोचले आहे. नीरा उजवा कालव्याची वहन क्षमता सध्या १ हजार ६०० क्युसेक आहे. ती दोन हजारपर्यंत वाढवण्याची गरज आहे. साहजिकच, या सगळ्या प्रश्नामुळे पाणी असूनही त्याचे नियोजन आणि वाटप योग्य पद्धतीने होत नसल्याने ही समस्या उद्भवली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com