agriculture news in marathi Nirmala Sitaraman Guides National Bank Conference | Agrowon

‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

वृत्तसेवा
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीयीकृत बँकांच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकांच्या एकदिवसीय राष्ट्रीय बँक परिषदेला गुरुवारी (ता. १६) येथे सुरुवात झाली.

औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल लिंकिंग यामुळे बँकिंग व्यवस्था व आर्थिक प्रवाहापासून दूर असलेल्या कुटुंबांना त्या प्रवाहात आणणे शक्य झाले. याशिवाय शासनाच्या योजनांचा लाभ थेट गरजूंपर्यंत पोहोचविण्यात मोठी मदत झाल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीयीकृत बँकांच्या अध्यक्ष व कार्यकारी संचालकांच्या एकदिवसीय राष्ट्रीय बँक परिषदेला गुरुवारी (ता. १६) येथे सुरुवात झाली. त्यामध्ये उद्‍घाटन सत्रात ऑनलाइन सहभागी होऊन केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन मार्गदर्शन करीत होत्या. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘जनधन योजनेबाबत तिचे फायदे पाहता आता अनेकांच्या मनातील संकोच दूर झाले असतील. कोरोना काळात खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत पोहोचविणे शक्य झाले व भ्रष्टाचारालाही आळा बसला. 

या वेळी अर्थराज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, ‘‘जनधनमध्ये आजवर ४३ करोड खाती उघडली. देशातील १११ जिल्ह्यांत यावर विशेष काम करण्याची गरज आहे. शाश्‍वत विकासाचे उद्दिष्टे २०३०पर्यंत पूर्ण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जगातील १९३ देशात भारतही आहे. पंतप्रधानांचे गरिबांतील गरीब व्यक्तींपर्यंत शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’

आर्थिक धोरण, योजनांची अंमलबजावणी, सरकारची भूमिका व पुढाकार, कृषी आणि राज्य विकास, पंतप्रधान मुद्रा योजना, बँकांच्या शाखा, ग्रामीण भागातील सेवा, कोरोनाचा अर्थकारणावरील परिणाम, आर्थिक गुंतवणुकीची गती, डिजिटलायझेशन आदींविषयी या परिषदेत विशेष मंथन झाले.

या परिषदेला केंद्रीय अर्थ खात्याचे सहसचिव डॉ. बी. के. सिन्हा, आयबीएचे अध्यक्ष राजकिरण राय, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन दिनेश खरा, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टामटा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. स्वागतपर विचार पंजाब नॅशनल बँकेचे एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. मल्लिकार्जुन राव यांनी व्यक्त केले.


इतर ताज्या घडामोडी
पांगरीत पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फोन...पांगरी, ता. बार्शी ः पीक नुकसानीची तक्रार...
जोरदार पावसाने जेवळी परिसरात तलाव भरले जेवळी, जि. उस्मानाबाद : जेवळी व परिसरात दोन- तीन...
कुसुंबामध्ये शंभर क्विंटल कांदा चाळीतून...कुसुंबा, जि. धुळे ः कुसुंबा येथील शेतकरी सुभाष...
पीकविम्याप्रश्‍नी केंद्र सरकार म्हणणे...उस्मानाबाद : गेल्या वर्षी पीकविमा कंपन्यांनी...
गिरणा पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर कराभडगाव/पाचोरा, जि. जळगाव : तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
हिंगोली जिल्ह्यात बासष्ट हजार क्विंटलवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
साठा मर्यादा निर्णयाची  राज्यात... हिंगणघाट, जि. वर्धा :  केंद्र सरकारने गरज...
`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण...नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या...
भारनियमन केले जाणार नाही; वीजनिर्मिती...मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीजनिर्मिती कमी...
पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात...नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत...
मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
वाशीम जिल्ह्यात नुकसानग्रस्तांना ६.७७...वाशीम : जिल्ह्यात यंदा मार्च, एप्रिल आणि मे या...
संकरित वाणाची होणार सधन पद्धतीने लागवड  नागपूर : सरळ वाणाचा उपयोग करून कापसाची...
द्राक्षबागेत फळछाटणीनंतर उडद्या...द्राक्ष बागेत ऑक्टोबर फळछाटणीनंतर उडद्या...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
`कुरनूर’मधून २१०० क्युसेकचा विसर्गसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर मध्यम बोरी...
सोलापूर जिल्हा दूध संघावरील प्रशासकाची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
कापूस वेचणीचा खर्च सात रुपये प्रतिकिलोजळगाव ः खानदेशात पावसामुळे पिकांची हानी सुरूच आहे...
खानदेशात एकच केळी दर जाहीर करावाजळगाव ः खानदेशात केळीचे वेगवेगळे दर रोज जाहीर...