agriculture news in Marathi NISARG cyclone landed in land Maharashtra | Agrowon

‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमान

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला.

पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रुप धारण केले. किनारपट्टीलगत वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढल्याने झाडे उन्मळून, मोडून पडली. जमिनीवर येताच या वादळाचा वेग कमी होण्यास सुरुवात झाली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यालगतची गावे, सखल भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. बुधवारी (ता.३) पहाटेपासून वादळाची तीव्रता आणखी वाढली. ही वादळी प्रणाली वेगाने महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे झेपावत असल्याने सकाळपासूनच समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. कोकणासह घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग वाढून पावसाला सुरवात झाली. रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यावरून मध्यप्रदेशकडे जाणार आहे. दरम्यान, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातही वादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. 

वादळ जमिनीकडे येताच वादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. दुपारी साडे तीन वाजता वादळाचे केंद्र अलिबागच्या दक्षिण भागात होते तर मुंबईपासून ७५ किलोमीटर अंतरावर अग्नेय दिशेला, पुण्यापासून पश्चिमेला ६५ किलोमीटर अंतरावर वादळ घोंगावत होते. या कमी दाब क्षेत्राचे केंद्र ताशी २० किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकू लागले आहे. रात्री उशिरापर्यंत वादळाची तीव्रता कमी होण्याचे संकेत होते.

या वादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यात ताशी १०० ते ११० किलोमीटर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ९० किलोमीटर वेगाने, तर गुजरातच्या वलसाड, नवासरी येथे ८० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. महाराष्ट्र, गुजरात, गोवा किनाऱ्यालगत समुद्रात १ ते २ मीटर उंच लाट उसळत होत्या. तर वादळामुळे रायगडसह कोकणात घराची पडझड होऊन, छपरे उडून गेली. नारळाची झाडे मोडून पडली. तर इतर झाडे उन्मळून पडली. जोरदार वारे आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. 

गेल्या ७२ वर्षामध्ये प्रथमच ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहणारे तीव्र चक्रीवादळ मुंबईला धडकले असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर वादळामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीवर नियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी नौदल आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यात २० पथके आपत्तीनिवारणासाठी काम करत असून, यापैकी पाच पथके विशाखापट्टणम येथून आणण्यात आली आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. बृहन्मुंबई महापालिकेने भायखळा येथील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.  

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा 
‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे, पाऊस पडत आहे. आज (ता.४) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर रायगडमध्ये जोरदार पाऊस पडत असून, आज (ता.४) नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

वादळामुळे नुकसान

 • मुंबई, रायगडसह कोकणाला तडाखा 
 • नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातही प्रभाव वाढला
 • कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग वाढला
 • उंच लाटा, जोरदार वारे, झाडे उन्मळून पडली
 • वीजेचे खांब वाकले, घरांची पडझड, छपरे उडाली.
 • किनारपट्टीवरील हजारो लोकांचे स्थलांतर 
 •  प्रशासन, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर प्रयत्न

पिकांना मोठा फटका

 • भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान 
 • रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारी, आंब्याची झाडे उन्मळून पडली
 • द्राक्ष, डाळींब, केळी, पपईसह फळबागा झोपल्या 
 • कांदा, ऊस, मक्यासह उभ्या पिकांचे नुकसान
 • पोल्ट्री शेड, पॉलीहाऊस, कांदा चाळी, पशुधानाच्या गोठ्यांची पडझड, पत्रे उडाली
 • शाळा, अंगणवाड्या, घराचे पत्रे आणि छपरे उडून गेली
   

इतर बातम्या
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
‘कृषी अधिकारीच म्हणतात, खतांसंदर्भात...पुणे ः शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासत आहे. कृषी...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापुरात निकृष्ट सोयाबीन...सोलापूर  ः जिल्ह्यात निकृष्ठ सोयाबीनबाबत...
सोयाबीनची पेरणी खानदेशात वाढलीजळगाव  ः खानदेशात तेलबियांमध्ये सोयाबीनचे...