agriculture news in marathi Nisarga Cyclone weakens and changes to deep depression at Khandesh, Vidarbha region | Agrowon

‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम विदर्भादरम्यान कमी दाब क्षेत्रात रूपांतर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सरकले. आज सकाळी (ता.४) हे या वादळाची तीव्रता कमी झाली.

पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सरकले. आज सकाळी (ता.४) हे या वादळाची तीव्रता कमी झाली. खानदेशासह पश्‍चिम विदर्भ आणि परिसरावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) सक्रिय होते. पुढील सहा तासांमध्ये ही प्रणाली आणखी निवळणार असून, मध्य प्रदेशात सरकून जाणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्रात ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ बुधवारी (ता.३) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अलिबाग जवळ किनारपट्टीला धडकले. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडला. वादळाच्या प्रभावामुळे उंच लाटा उसळल्याने समुद्राने रौद्र रूप धारण केले. किनारपट्टीवर विध्वंस केल्यानंतर या वादळाने जोरदार वारे, पावसासह ईशान्य दिशेकडे प्रवास सुरू केला. रायगड, ठाणे, पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यावरून पुढे सरकताना वादळाने अक्षरशः थैमान घातले. वादळाच्या प्रवाहात येणारी फळबागा, भाजीपालासह शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास ९० ते १०० किलोमीटर वेगाने वाहणारे वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली. पोल्ट्रीशेड, कांदाचाळी, शाळा, जनावरांचे गोठे, घरांची छपरे उडून गेली.
 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...