Agriculture news in marathi 'Nisarga' hits farmers in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग चक्रीवादळ नाशिकच्या दिशेने सरकत असताना त्याचा अकोले, संगमनेर, पारनेर, नगर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागालाही बुधवारी (ता.३) सायंकाळी तडाखा बसला.

नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग चक्रीवादळ नाशिकच्या दिशेने सरकत असताना त्याचा अकोले, संगमनेर, पारनेर, नगर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागालाही बुधवारी (ता.३) सायंकाळी तडाखा बसला. दोन दिवसांत झालेल्या पुर्वमोसमी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीची माहिती घेतली जात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले. 

अकोले भंडारदरा परिसरातील बारी, रतनवाडी, घाटघर, साम्रद, तिरढे, खिरविरे, चोंडे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली होती. वादळामुळे झाडे, विजेचे खांब आणि अनेक घरांच्या भिंती पडल्या. अनेक घरांवरील कौले उडाली. परिसरातील जनतेची त्यामुळे धावपळ उडाली. या शिवाय जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपासून नगरच्या अनेक भागात सलग तीन दिवस पाऊस झाला. 

अकोले तालुक्‍यातील आंबेवाडी, रतनवाडी, साम्रद, राजूर, समशेरपूर, अकोले या भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. खिरविरे विभागातील जिल्हा परिषद शाळांचे, चंदगीरवाडी व इदेवाडी येथील शाळेच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले. लहित बुद्रुक येथील सागर पांडूरंग चौधरी (वय३२) या तरुणाचा अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. 

संगमनेर तालुक्यात शेती, चारापिकांचे नुकसान झाले. पारनेर तालुक्‍याला जोडणाऱ्या घाटात काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सावरगाव घुले येथील प्राथमिक शाळेमागील विजेचे चार खांब, तर रोकुड वस्तीजवळील तीन खांब पडले. मांडवे गावात घरांचे व गोठ्यांचे पत्रे उडाले. बिरेवाडीत डाळिंबांच्या बागांचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात सोनईत बाळासाहेब गडाख यांच्या पॉलिहाऊसचे आडीच लाखाचे, बाळासाहेब दरंदले यांचे दीड लाखाचे, दत्ता सोनवणे यांचे एक लाखापेक्षा अधिकचे नुकसान झाले. लांडेवाडी, हिंगणी येथे वादळाचा फटका बसला.

पॉलीहाऊसमधील फुलपिकांचेही नुकसान झाले. रस्त्यावरही झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. नुकसानीची कृषी व महसूल विभाग माहिती घेत आहे. पंचनामे करण्यात येणार आहेत. 

विजेचे ब्रेक-डाऊन 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हामधील बहूतांश भागात विजेचे ब्रेकडाऊन करण्यात आले. त्यामुळे वीजपुरवठा दिवसभर चालू-बंद होता. बहूतांश भागात बुधवारी रात्री उशिरापर्यंत वीज नव्हती. 

अकोले, संगमनेरमध्ये जोरदार सरी 

अकोले, संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. घाटघर येथे तब्बल १३१ मिलीमीटर, तर रतनवाडी येथे १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय पांजेरत ९१, वाकी येथे ६५, भंडारदरा येथे ७३, निळवंडे येथे ९८, आढळा येथे ४५, अकोले येथे ९१, संगमनेरला ५४, ओझरला ४३, श्रीरामपुरला ४० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...