मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीन
नाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले.
नाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता.२९) सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ, निमलष्करी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकर, पोलिस आयुक्त दीपक पांडेय, नाशिक पोलिस परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीने फैरी झाडून भालेराव यांना मानवंदना दिली.
भुजबळ यांनी भालेराव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मुळचे भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण कले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून केंद्रीय राखीव दलात २०१० साली भरती झाले.
त्यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीममध्ये त्यांनी सेवा दिली. त्यानंतर राजस्थान मधील माउंटअबू स्थित''अंतर्गत सुरक्षा अकादमी'' येथे त्यांनी काम केले. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियनमध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती. त्यांच्या पश्चात आई भारती, पत्नी रश्मी, मुलगी अन्वी, तर दोन भाऊ असा परिवार आहे.