agriculture news in marathi; Nitin Gadkari appeals farmers to remove the anti national elements from Delhi agitation | Agrowon

विघातक प्रवृत्तींना हटवा; गडकरींचे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन

मंगेश वैशंपायन/ सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 16 डिसेंबर 2020

‘‘कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात घुसून काही नक्षलवादी व देशविरोधी प्रवृती शेतकऱ्यांच्या मंचाचा दुरुपयोग करत आहेत. शेतकऱ्यांनीच अशा प्रवृतींना आंदोलनातून खड्यासारखे बाजूला फेकले पाहिजे,’’ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 नवी दिल्ली ः ‘‘कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात घुसून काही नक्षलवादी व देशविरोधी प्रवृती शेतकऱ्यांच्या मंचाचा दुरुपयोग करत आहेत. या कायद्याबाबत शेतकऱ्यांची शुद्ध दिशाभूल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीच अशा प्रवृतींना आंदोलनातून खड्यासारखे बाजूला फेकले पाहिजे,’’ असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. शेतकरी व सरकार यांच्यातील चर्चा थांबायला नको. कारण तसे झाले तर गैरसमज वाढत जातील असे सांगून त्यांनी शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेला येण्याचेही आवाहन केले. 

तिन्ही कायदे मागे घेणे हाच शेतकऱ्यांचा पहिला मुद्दा आहे. ‘येस ऑर नो’ या त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तर काय ? 
गडकरी ः
अशा पद्धतीने तुकडा पाडल्यासरखे प्रश्‍न मिटत नाहीत. कायद्यातील दुरुस्त्यांबाबत सरकार खुल्या मनाने शेतकऱ्यांच्या सूचना ऐकेल व दुरुस्त्या करेल. शेतकरी हिताला समर्पित असलेल्या या सरकारने शेतकरी आंदोलनाला कधीही कमी लेखले नाही. सध्या शेतकरी नेत्यांशी कृषिमंत्री व वाणिज्यमंत्री चर्चा करत आहेत. मला चर्चा करण्यास सांगितले तर मीही शेतकरी नेत्यांशी चर्चा करेन. 

शेतकऱ्यांची समजूत का पटत नाही? 
गडकरी ः
शेतकऱ्यांची दिशाभूल करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उत्पादने बाजार समितीत विकायची असतील, तर त्याला तेही स्वातंत्र्य कायद्यातच देण्यात आले आहे. हमीभावाबाबत (एमएसपी) सरकारने लेखी दिले आहे. कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंगचा आक्षेपही चुकीचा आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतो त्यामागील मुख्य कारण काय? त्याच्याकडे पैसा नाही. त्याला दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याने त्याच्या शेतीत उत्पन्न घेऊन भांडवली खर्च करण्याची हमी दिली तर यात अदानी-अंबानी कोठून येतात? कॉन्ट्रॅक्‍ट फार्मिंगमध्ये जमिनीची मालकी कधीही हस्तांतरित होत नाही, होणार नाही. एमएसपीबाबत दर वर्षी मंत्रिमंडळासमोर राष्ट्रीय कृषी मूल्य आयोग, निती आयोग सूचना देतात व त्यानुसार टिपण बनते व एमएसपीमध्ये वाढ केली जाते. या सरकारने ‘एमएसपी’ गेल्या ६ वर्षांत वाढवत नेली आहे. 

अण्णा हजारेही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत... 
गडकरी ः
या सरकारने शेतकऱ्यांचे काहीही वाईट केलेले नाही व कायद्यांमुळे तसे होणारही नाही. अण्णा हजारे यात सहभागी होतील असे मला वाटत नाही. त्यांनी उपोषणाचा निर्णय बदलावा. 

केंद्रीय मंत्री आंदोलनाबद्दल देशद्रोही वगैरे का बोलत आहेत? 
गडकरी ः
शेतकऱ्यांच्या काही मागण्यांबाबत दुरुस्तीची सूचना सरकारने मान्य केली आहे. या आंदोलनात देशविरोधी भाषणे करणारे, नक्षलवादी समर्थक घुसले आहेत हे खरे नाही का? शेतकऱ्यांनी हे बिलकूल होऊ देऊ नये. आमच्याकडील गडचिरोली जिल्ह्यातील एका नक्षलवादी समर्थकाला न्यायालयानेही जामीन दिला नाही. त्याला व त्याच्या साथीदारांना तुरुंगातून सोडण्याचे फलक शेतकरी आंदोलनात कसे आले? आंदोलनात ज्या कुप्रवृत्ती घुसल्या त्यांच्या विरोधात मंत्री बोलले आहेत. 
 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...