बॅंकांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा ः नितीन गडकरी

बॅंकांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा
बॅंकांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा

पुणे ः सहकारी बॅंकांची विश्‍वासार्हता ही २१ व्या शतकातील भांडवल असून, व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन पारदर्शकता वाढवा असा सल्ला केंद्रीय जहाज आणि रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी नागरी सहकारी बॅंकांना दिला.  पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने शनिवारी (ता. २२) आयोजित विविध बॅंकाच्या गौरव समारंभात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमात बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्याधर अनासकर यांचा बॅकिंगरत्न, तर भगिनी निवेदिता सहकारी बॅंकेच्या ज्येष्ठ संचालिक शीलाताई काळे यांचा मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.  या वेळी बोलताना गडकरी म्हणाले, की सहकारी संस्थेच्या यशस्वी होण्यासाठी विश्‍वासार्हता, व्यक्तिगत संबंध आणि संपर्क या त्रिसूत्री गरजेच्या आहेत. या त्रिसूत्रीचा योग्य वापर केल्या संस्था यशस्वी होतात. तर अनेक संस्था कायद्या मोडून काम करत असल्यामुळे अडचणीत येतात. यामुळे सर्वच सहकार क्षेत्र बदनाम होते. याचा फटका चांगले काम करणाऱ्या संस्थांना होतो. गरजू व्यक्ती, उद्योगांना कर्ज देताना कायदा वाकवा मात्र तोडू नका. ``सध्या माहितीचा अधिकार आणि तंत्रज्ञानाच्या युगात बॅंका चालवणे अवघड झाले असून, पारदर्शकते शिवाय यशस्वी होणे अवघड आहे. तर २१ व्या शतकात सहकारी संस्थांची विश्‍वासार्हता हेच भांडवल असणार असून, या क्षेत्रात व्यावसायिकता हवी, पण कॉर्पोरेट कल्चर आणू नका. सुभाष देशमुख म्हणाले, की अनेक सहकारी बॅंका चांगले काम करत असून, रिझर्व्ह बँकेकडून नागरी सहकारी बँकांना सापत्न वागणूक मिळत आहे. अडचणीतील राष्ट्रीयीकृत बॅंकांना केंद्र सरकारकडून पॅकेज दिली जातात. मात्र सहकारी बँकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. विविध बॅंक हमीसाठी सहकारी बॅंकांना परवानगी दिल्यास व्यवसायवृद्धी होईल. नागरी सहकारी बॅंकाच्या प्रश्‍नांसाठी नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन, केंद्रीय अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी, अशी मागणी या वेळी केली.   

पीकपद्धतीत बदल आवश्‍यक शेतीमधील पांरपरिक पीकपद्धती बदलल्या शिवाय शेती फायद्यात येणार नाही. यासाठी सहकारी बॅंकांनी कृषी क्षेत्रातील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास आणि संशोधन करून, त्यांनी कर्ज देण्याची गरज आहे. तसेच थेट इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पांसाठीदेखील सहकारी बॅंकांनी वित्तपुरवठा करण्याची गरज आहे, मंत्री गडकरी म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com