शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळावे ः नितीन गडकरी

Agrovision expo
Agrovision expo

नागपूर : पारंपरिक पीकपद्धतीच्या मर्यादा लक्षात घेत शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळले पाहिजे, त्यासाठी ॲग्रोव्हिजन अनेक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यात साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.  रेशीमबाग मैदानावर शुक्रवारी (ता. २२) पार पडलेल्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सोमवारपर्यंत (ता. २५) प्रदर्शन राहणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. अनिल बोंडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची या वेळी उपस्थिती होती.  मंत्री गडकरी पुढे म्हणाले, की पारंपरिक ऊर्जेला अपारंपरिक ऊर्जेचा पर्याय उपलब्ध झाला पाहिजे, त्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था गतिमान होणार नाही. शेती आधारित भारताच्या अर्थव्यवस्थेकरिता शेतकऱ्यांनी पिकांऐवजी शेतात ऊर्जा पिकविण्यावरच भर दिला पाहिजे. इथेनॉल व इतर ऊर्जा पर्यायांचा शेतकऱ्यांनी विचार करावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीसाठी दिशादर्शक ठरेल, त्यादृष्टीने पूरक प्रयत्न हवेत. शेतीमध्ये नगदी पिकांचा अंगीकार आणि दुग्ध तसेच कुक्कुटपालनाची जोड हे समीकरण आर्थिक सक्षमतेकडे घेऊन जाण्यास साहाय्यभूत ठरणार आहे. अशा अनेक पर्यायांतून आधी कुटुंबाचे आणि नंतर गावाचे सक्षमीकरण साधले जाईल. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी सरकार कुणाचे येईल याचा विचार न करण्याचा सल्ला दिला. त्याऐवजी येणाऱ्या सरकारमध्ये आपल्याला चांगले काम करायचे आहे, हा विचार रुजवा, असे ते म्हणाले. या वेळी काही माहितीपर पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com