agriculture news in Marathi, Nitin Gadkari says, organic farming pattern will be success when farm without urea will come forword , Maharashtra | Agrowon

युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच सेंद्रिय पॅटर्न यशस्वी: नितीन गडकरी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून होत असताना शेतकऱ्यांमध्ये अद्याप माती आणि परीक्षणाप्रती अपेक्षित जागरूकता नाही. माती आणि पाणी परीक्षणाकरिता जागरूकता वाढविण्यासोबतच युरियाशिवाय शेती हा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजला तरच सेंद्रिय शेतीचा पॅटर्न देशात रुजेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला. 

नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून होत असताना शेतकऱ्यांमध्ये अद्याप माती आणि परीक्षणाप्रती अपेक्षित जागरूकता नाही. माती आणि पाणी परीक्षणाकरिता जागरूकता वाढविण्यासोबतच युरियाशिवाय शेती हा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजला तरच सेंद्रिय शेतीचा पॅटर्न देशात रुजेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत तीनदिवसीय जागतिक सेंद्रिय परिषदेचे उद्‍घाटन रविवारी (ता. १५) केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते हॉटेल लि-मेरिडियन येथे पार पडले. या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. सी. डी. मायी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी, कुलगुरू डॉ. विलास भाले, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती. 

श्री. गडकरी म्हणाले की, सर्व प्रकारच्या शेतमालाचे अतिरिक्‍त उत्पादन देशात होते. परंतू खाद्यतेलाची ७० टक्‍के आयात देशाला करावी लागते. त्यामुळे खाद्यतेल उत्पादनवाढीवर भर देण्याची गरज आहे. या माध्यमातून देशातून बाहेर जाणारा पैसा वाचणार आहे. सात कोटींची आयात होते. यातील दोन कोटी रुपयांची जरी बचत झाली तर देशाची आर्थिक स्थिती काही अंशी सुधारेल. ओमानवरून युरियाकरिता गॅस विकत घेतला जातो, हाच गॅस रशियावरून घेतल्यास स्वस्त पडणार आहे. त्या माध्यमातून युरियाकरीता अनुदानाचीदेखील गरज भासणार नाही. सध्या २५ हजार टन युरियाची गरज पडते. भविष्यात युरियाशिवाय शेतीचा विचार केला पाहिजे. त्याकरीता कमी खर्चाच्या शेतीपद्धतीचे मॉडेल विकसित करण्याची गरज आहे. नेपीयर गवतापासून अपारंपरिक ऊर्जा तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प प्रस्तावीत असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली. 

‘‘आयातीला पर्याय शोधला तरच भारतीय शेती फायद्याची होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पूर्वी विदर्भात उसाची उत्पादकता जेमतेम होती. सेंद्रिय कर्ब वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊस उत्पादकता मिळविण्यात यश आले आहे,’’ असेही मंत्री गडकरी म्हणाले.

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत मोनोक्रोटोफास सर्वाधिक विकल्या जात असल्याचे सांगितले. स्वस्त मिळते म्हणून त्याचा वापर होतो. परंतू त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षित केल्या जातात. रासायनिक शेतीइतकेच उत्पादन आणि उत्पन्न मिळेल असा सक्षम पर्याय दिला तरच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील. त्याकरिता संशोधनाची दिशा विद्यापीठांनी निश्‍चित करावी. कृषी विभागाकडून निंबोळी वापराला प्रोत्साहन मिळावे याकरीता निमपार्क प्रस्तावीत करण्यात आला आहे. पाच हजार हेक्‍टरवर कडुलिंबाच्या झाडांची लागवड याद्वारे केली जाणार आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले. सूत्रसंचालन निंबार्ते यांनी  केले, तर प्रा. एस. आर. पोटदुखे यांनी आभार मानले. 

अंबानींना घातली पाटलांच्या सीताफळाने भुरळ
वर्धा जिल्ह्यातील पाटील नामक शेतकरी जैविक सीताफळ उत्पादन घेतात. मुकेश अंबानी नागपुरात आले असताना त्यांच्या बागेतील सीताफळ अंबानी यांना भेट दिली. सीताफळाच्या चवीने मुकेश अंबानींना भुरळ घातली. आज त्यांच्याकडून या सिताफळांना दरवर्षी मागणी केली जाते, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
मुंबईत पावसाची दमदार हजेरी; आज...मुंबई : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवार (ता.३...
वाढत्या तणावात कापसाच्या होताहेत वातीचालू हंगामातील कापूस वेचणी दोन ते अडीच महिन्यांत...
बाजारपेठा काबीज करण्याची हीच संधीको रोनाच्या वैश्‍विक संकटाशी लढताना जगातील अनेक ...
जिल्हा बॅंकांची थकबाकी २३ हजार कोटींवरसोलापूर : राज्यात कर्जमाफी योजना लागू असली, तरी...
कृषी पदविका, तंत्रनिकेतनच्या अंतिम...पुणे  : राज्यातील कृषी पदविका व तंत्रनिकेतन...
भारतीय अन्न महामंडळाबाबतचा शांता कुमार...पुणे : भारतीय अन्न महामंडळाची (एफसीआय) उपयुक्तता...
पंधरा हजार कोटींची शेतीमाल निर्यात...पुणे : जागतिक कृषी उत्पादनाच्या नकाशावर बलाढ्य...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसाचा जोरपुणे  : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणात दडी...
शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास बँका...पुणे  : खरीप विमा योजनेत सहभागी होण्यासाठी...
अप्रमाणित बियाण्यांबाबत न्यायालयात दावे...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना अप्रमाणित...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजपासून...पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे...
भारत-चीन तणावाचा कापूस निर्यातीला फटकाजळगाव ः जगभरात वस्त्रोद्योगाची चाके फिरण्यास...
खानदेशात कापूस खरेदीला ‘ब्रेक’जळगाव ः शासकीय कापूस खरेदीला खानदेशात मागील...
बोगस बियाणे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा...पुणे ः सोयाबीनच्या बोगस बियाणेप्रकरणी मुख्यमंत्री...
लॉकडाउनमध्ये १४ लाख क्विंटल फळ,...लातूर ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सुरू...
राज्यात ठिबक अनुदानासाठी १९१ कोटी रुपये...सोलापूर : राज्यात यंदा दोन लाख १३ हजार ७५५...
पीककर्ज द्या, अन्यथा पोलिसांत तक्रारसोलापूर : पीककर्जाचे शासकीय नियमानुसार वितरण न...