औरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक अर्जुन गाढे यांची गुप्त मतदानाअंती निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
Nitin Patil as the Chairman of Aurangabad District Bank
Nitin Patil as the Chairman of Aurangabad District Bank

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे समर्थक अर्जुन गाढे यांची गुप्त मतदानाअंती निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप मिळून तयार झालेल्या शेतकरी विकास पॅनेलला २० पैकी १४ जागा मिळाल्या होत्या. तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनेलला ५ व अपक्ष एका उमेदवाराला विजयश्री खेचून आणता आली होती. शेतकरी विकास पॅनल व शेतकरी सहकारी बँक विकास पॅनेलने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकत सत्तेची सूत्रे आपल्याकडे ठेवली.

मात्र, या पॅनलचे नेते माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांना निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर नाट्यमय घडामोडीत नितीन पाटील यांनी थेट मातोश्री गाठत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांचा अध्यक्ष होण्याचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात होते. त्यानुसार सोमवारी (ता. ५) निवडीत सुरुवातीला अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. तर मंत्री संदीपान भुमरे यांनीही अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.

उपाध्यक्षपदासाठी पाच अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये  अर्जुन गाढे, दिनेश परदेशी, कृष्णा पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे आणि आप्पासाहेब पाटील या पाच जणांच्या अर्जाचा समावेश होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या गुप्त मतदान प्रक्रियामध्ये अब्दुल सत्तार यांचे कट्टर समर्थक अर्जुन गाढे विजय झाले. अर्जुन गाढे यांना १३ मते मिळाली तर त्यांच्याविरोधात उभे असलेले कृष्णा पाटील डोणगावकर यांना केवळ ७ मते मिळाली. त्यामुळे अर्जुन गाढे हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन व सूचनेनुसार आवश्यक ती खबरदारी घेऊन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पाडल्याचे श्री. दाबशेडे म्हणाले.

या निवड प्रक्रियेसाठीच्या बैठकीकरिता भोकरदनचे सहायक निबंधक श्रीराम सोन्ने, झुंजारे, सचिन जाधव, बँकेचे जीएम अजय मोटे यांनी सहकार्य केले. यावेळी रामेश्वर रोडगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com