रत्नागिरी : शेतीजमिनीतील नत्र, स्फुरद, झिंक बोरानचे प्रमाण घटले

स्फुरदचे प्रमाण १५ ते २५ केजी परहेक्टर असणे आवश्यक असते. परंतु हे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नत्र २८० केजी प्रतिहेक्टर असणे आवश्यक आहे. परंतु, त्याचेही प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी सेंद्रिय खत, गांडूळखताचा वापर करावा. - एस. सी. धाडवे, जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी
soil testing
soil testing

रत्नागिरी ः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताच्या अतिवापराचा परिणाम शेतजमिनीवर होत आहे. जिल्हा कृषी अधीक्षक विभागाकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर मृदा आरोग्य पत्रिका अभियान जिल्ह्यात राबविले होते. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील एक मॉडेल गाव निवडून केलेल्या माती परिक्षणात नत्र, स्फुरद आणि झिंक बोरानचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे. त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊ शकतो. जमिनीची शेती मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड आदी कारणांमुळे जमिनीची धूप होते. भविष्यात जमीन आरोग्याचे निदान करण्यासाठी माती परिक्षण तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्यच होणार असून या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे गंभीर परिणाम फक्त शेतीवरच न दिसता मानवी शरीर आणि प्राणी इत्यादींना सुद्धा जाणवणार आहेत. हे लक्षात घेऊन शासनाने जमीन आरोग्य पत्रिका हा पथदर्शी प्रकल्प राबविला. या प्रकल्पाअंतर्गत ४०३० नमुने तपासणी करण्यात आले. शेतपिकाच्या वाढीसाठी १२ अन्नद्रव्ये आवश्यक असतात. यामध्ये सामु, क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश नायट्रोजन, तांबे, बोरान आदि घटकांचा समावेश आहे. मृदा आरोग्य पत्रिका अभियानाअंतर्गत मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. यामध्ये प्रमुख्याने जस्त, नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसामुळे दरवर्षी एक हेक्टर जमिनीतील १० ते ११ टन माती वाहून जाते. एक इंच माती तयार होण्यासाठी पाचशे वर्षे लागतात. कोकणातील मातीची झीज होत आहे. शिवाय मातीतील घटकदेखील कमी होत आहेत. पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी प्रमुख्याने सुक्ष्म मूलद्रव्याचे प्रमाण पाच पर मिलीयम इतके असणे आवश्यक आहे. परंतु, हेच प्रमाण कमी असल्याने मुणांची वाढ होत नाही. त्यामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com