‘नीट-जेईई’च्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी आयआयटीची मदत

‘जेईई’ आणि ‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईतील आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. प्रवासाची अशी अडचण असणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, तसेच प्रवासाची सोयही उपलब्ध करून देणार आहे.
IIT_mumbai_1.jpg
IIT_mumbai_1.jpg

मुंबई : ‘जेईई’ आणि ‘नीट’ या केंद्रीय सामायिक प्रवेश परीक्षा १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे पुरेशा प्रमाणात वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचायचे कसे, असा प्रश्‍न लाखो विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांसाठी आयआयटी मुंबईतील आजी-माजी विद्यार्थी सरसावले आहेत. प्रवासाची अशी अडचण असणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांना आयआयटीचे विद्यार्थी आर्थिक मदत, तसेच प्रवासाची सोयही उपलब्ध करून देणार आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी यासाठी https://www.eduride.in/ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यात गरजू विद्यार्थ्यांना आपली माहिती, पिन कोड व ऍडमिट कार्ड यांचीही माहिती भरावी लागणार आहे. स्वयंसेवकांसाठीही त्यांच्याकडे असलेली वाहने, प्रवासाचे ठिकाण, कोणत्या प्रकारची आर्थिक मदत या प्रवासासाठी दिली जाणार आहे, याची माहिती भरावी लागणार आहे. ज्यांना कॅबसारखी वाहने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील, त्यांनी आर्थिक मदत अथवा वाहनांसाठीची बुकिंग करून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, आदी समाज माध्यमांवर मोहीम उघडण्यात आल्याचे आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com