भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही : पोपटराव पवार

भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत मोठे आव्हान आहे. देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाची अत्यंत गरज आहे, असे मत आदर्श सरपंचपोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही : पोपटराव पवार No alternative without ground water, crop management: Popatrao Pawar
भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही : पोपटराव पवार No alternative without ground water, crop management: Popatrao Pawar

नगर : भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत मोठे आव्हान आहे. देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाची अत्यंत गरज आहे, असे मत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. खासदारांसह लोकप्रतिनिधींनी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहनही केले. 

‘ग्रामविकास’ या विषयावर देशातील खासदारांसाठी आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत खासदारांना पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, ‘‘आज देशातील १५ राज्यात भीषण पाणीटंचाई असून, ५२ टक्के भूभाग हा अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे. विहिरीद्वारे होणारे सिंचन वरच्या भूस्तरातून होते. 

आपण आता खोलवरच्या भूस्तरातून (बोअरवेलद्वारे) पाणी उपसा करत असून, परिणामी दरवर्षी ३० ते ४० हजार बोअरवेल कोरडे पडत आहेत, तर भविष्यकाळात वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. सर्वात सुपीक भूभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबच्या मातीने भारताची भूक भागविली, तिथे सुद्धा ३०० ते ४०० फूट खोलवर गेल्याशिवाय पाणी मिळत नाही. त्याचबरोबर राजस्थान, गुजरात, तेलंगण, तमिळनाडू, ओडिशा या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकासमोर भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाशिवाय  पर्याय नाही.’’ 

हिवरे बाजारच्या प्रयोगातून भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनातून हिरवेगार, पाणीदार, निर्व्यसनी गाव निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. समृद्धीच्या मागे चंगळवाद व व्यसनाधीनता येऊ नये, यासाठी तरुणाईला संस्कारक्षम बनविण्याची विशेष गरज आहे, अन्यथा व्यसनाधीन कुटुंब व व्यसनाधीन गावे राष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान असेल. संस्कार देण्याची, शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.  भारतीय संस्कृतीत संत साहित्य अभ्यासक्रमात व आचरणात येणे गरजेचे आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या घटकांसाठी सरकारी व्यवस्था आहे. अन्यथा खासगीकरणातून नवी विषमता निर्माण होईल, असेही पवार म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com