Agriculture news in marathi No alternative without ground water, crop management: Popatrao Pawar | Page 2 ||| Agrowon

भूजल, पीक व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही : पोपटराव पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत मोठे आव्हान आहे. देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाची अत्यंत गरज आहे, असे मत आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

नगर : भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वांत मोठे आव्हान आहे. देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाची अत्यंत गरज आहे, असे मत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. खासदारांसह लोकप्रतिनिधींनी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहनही केले. 

‘ग्रामविकास’ या विषयावर देशातील खासदारांसाठी आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत खासदारांना पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, ‘‘आज देशातील १५ राज्यात भीषण पाणीटंचाई असून, ५२ टक्के भूभाग हा अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे. विहिरीद्वारे होणारे सिंचन वरच्या भूस्तरातून होते. 

आपण आता खोलवरच्या भूस्तरातून (बोअरवेलद्वारे) पाणी उपसा करत असून, परिणामी दरवर्षी ३० ते ४० हजार बोअरवेल कोरडे पडत आहेत, तर भविष्यकाळात वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. सर्वात सुपीक भूभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबच्या मातीने भारताची भूक भागविली, तिथे सुद्धा ३०० ते ४०० फूट खोलवर गेल्याशिवाय पाणी मिळत नाही. त्याचबरोबर राजस्थान, गुजरात, तेलंगण, तमिळनाडू, ओडिशा या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकासमोर भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाशिवाय 
पर्याय नाही.’’ 

हिवरे बाजारच्या प्रयोगातून भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनातून हिरवेगार, पाणीदार, निर्व्यसनी गाव निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. समृद्धीच्या मागे चंगळवाद व व्यसनाधीनता येऊ नये, यासाठी तरुणाईला संस्कारक्षम बनविण्याची विशेष गरज आहे, अन्यथा व्यसनाधीन कुटुंब व व्यसनाधीन गावे राष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान असेल. संस्कार देण्याची, शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. 
भारतीय संस्कृतीत संत साहित्य अभ्यासक्रमात व आचरणात येणे गरजेचे आहे. आर्थिक क्षमता नसलेल्या घटकांसाठी सरकारी व्यवस्था आहे. अन्यथा खासगीकरणातून नवी विषमता निर्माण होईल, असेही पवार म्हणाले.
 


इतर ताज्या घडामोडी
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...
रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी...जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व...
किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा...नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक...
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार...बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना...
बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते...जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला...
सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि...
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक...
उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य...
...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलोभारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच...