agriculture news in marathi No Ban on agriculture work : CM Uddhav Thackarey | Agrowon

राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही : मुख्यमंत्री ठाकरे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

मुंबई : राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही. शेतकरी-शेतमजुरांना शेतावर जाण्यासाठीही निर्बंध नाहीत. शेतमालवाहतुक थांबवलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबई : राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही. शेतकरी-शेतमजुरांना शेतावर जाण्यासाठीही निर्बंध नाहीत. शेतमालवाहतुक थांबवलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. अजूनही सकाळी पुन्हा लोक गर्दी करत आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंसाठी बाहेर पडावे लागले, तरी आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिसांना देखील यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. 

राज्य शासनाच्या विनंतीनुसार मंगळवार (ता.२४) रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केल्याबद्दाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तर राज्यात कृषी विषयक कामांना बंदी नाही. तसेच शेतकरी शेतमजुरांना शेतावर जाण्यासाठी बंदी घातलेली नाही. शेतमालवाहतुक थांबवलेली नसल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मंगळवारी (ता.२४) मुख्यमंत्री ठाकरे राज्याला उद्देशुन संबोधित करत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,‘‘अजूनही सकाळी पुन्हा लोक गर्दी करताहेत असे चित्र आहे. जीव्नाव्शाय्क वस्तू, औषधी, दुध ,भाजीपाला घेण्यासाठी बाहेर यावे लागणार आहे पण आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिसाना देखील यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी देखील त्याची योग्य खातरजमा करून घ्यावी.''

''सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार ने आण करणारी वाहने अडवली गेली नाही पाहिजे अशा सुचना मी दिल्या आहेत. मात्र अशा अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे. वाहनांतील त्यातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावीत. अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करा,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

कालच पोलिसांनी काही लाख मास्क धाड टाकून पकडले त्यासाठी त्यांचे अभिनंदन, या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही साठेबजीची संधी घेऊ नये. जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. मी आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. अजिबात काळजी करू नका. अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये अशा सुचना मी दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये अशा सुचना पोलिसांना दिल्या आहेत. हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडूया, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. 

 


इतर बातम्या
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...