औरंगाबाद जिल्ह्यात ‘बर्ड फ्लु’चा नाही प्रादुर्भाव : चव्हाण

औरंगाबाद: जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्लू’या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. इतर जिल्ह्यातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणा सतर्क व सज्ज आहे.
No bird flu outbreak in Aurangabad district: Chavan
No bird flu outbreak in Aurangabad district: Chavan

औरंगाबाद: ‘‘जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्लू’या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. इतर जिल्ह्यातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणा सतर्क व सज्ज आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी (ता. १३) दिली.

‘बर्ड फ्लु’च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.  

चव्हाण म्हणाले, ‘‘ हा रोग रोखण्यासाठी यंत्रणा तयारीनिशी सज्ज आहे. कुक्कुटपालन केंद्र चालकांना याबाबतच्या मार्गदर्शक सूचना, माहिती देण्यात आली आहे. अद्याप जिल्ह्यात अशा प्रकारचा कोणताही संसर्ग आढळून आलेला नाही. तरी नागरीकांनी घाबरू नये. माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ वर फोन करावा. जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. रोगनियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, खडकेश्वर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येक तालुका स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) ठेवण्यात आली आहे.’’

‘‘अंडी व चिकन किमान ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत आहे. अंडी व चिकन खाणे पूर्ण: सुरक्षित आहे. अर्धवट शिजवलेले चिकन, कच्ची अंडी खाऊ नये. अफवा पसरविण्यात येऊ नयेत’’, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

‘‘जायकवाडी, नांदूर मधमेश्वर यासारख्या मोठी धरणे, तलाव इतर ठिकाणी किंवा स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत्यू आढळून आलेला नाही. नागरीकांनी खबरदारी घ्यावी’’, असे पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी यांनी यावेळी सांगितले.

पशुसंवर्धन विभागालाा माहिती कळवा

रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थिती माहिती ग्रामविकास अधिकारी, नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकीय स्वरूपात कळविणे बंधनकारक आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्षामध्ये मर्तूक झाली, पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये जास्त प्रमाणात मर्तुक झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यास माहिती द्यावी. मृत पक्षास हात लावू नये, शव विच्छेदन करून परस्पर विल्हेवाट लावू नये, असे चौधरी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com