मे महिन्यापर्यंत ‘अल-निनो’ची ६० टक्के शक्यता नाही

मे महिन्यापर्यंत ‘अल-निनो’ची ६० टक्के शक्यता नाही
मे महिन्यापर्यंत ‘अल-निनो’ची ६० टक्के शक्यता नाही

नवी दिल्ली : मे महिन्यापर्यंत विषुववृत्तीय प्रशांत महासागरात समुद्राचे पृष्ठभागाचे सरासरी तापमान सामान्य राहण्याची ६० टक्के शक्यता आहे. तसेच हे सामान्य तापमान ऑगस्ट महिन्यापर्यंत कायम राहण्याची ५० टक्के शक्यता आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान सामान्य राहणार म्हणजेच अल-निनो किंवा ला-निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता किंचित आहे किंवा नाही, असा अंदाज अमेरिकन क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने व्यक्त केला आहे.   पूर्व-मध्य प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा वाढल्यास अल-निनो परिस्थिती तयार होते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान फेब्रुवारीपर्यंत सरासरीपेक्षा ०.५ डिग्री सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे आणि मार्चपर्यंत सरासरीपेक्षा १ डिग्री सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. ऑगस्टपर्यंत शेवटच्या चार आठवड्यांत तापमानात थोडी वाढ झाली, तरीही अल-निनो स्थिती तयार होण्याची शक्यता नाही, असे अमेरिकन क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने म्हटले आहे. 

‘‘पूर्व-मध्य प्रशांत महासागरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान १ डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल,’’ असेही क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने म्हटले आहे.  ‘‘एप्रिलनंतरच्या अल-निनो स्थितीचा अंदाज खराच ठरेल असे नाही. ‘स्प्रिंग बॅरिअर’मुळे हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यास अडथळे येतात,’’ असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.    ‘अल-निनो’चा माॅन्सूनशी संबंध ऑगस्टपर्यंत तयार झालेल्या नैसर्गिक अल-निनो स्थितीचा फायदा भारताला होतो. जून ते सप्टेंबर दरम्यानच्या मॉन्सूनवर त्याचा चांगला परिणाम होतो. अल-निनो स्थिती विशेषतः भारतातील सरासरीपेक्षा कमी मॉन्सूनशी जोडलेली असते. १९०१ पासून भारतात पडलेल्या २० दुष्काळांपैकी जवळपास १३ दुष्काळ हे अल-निनो स्थितीशी संलग्न आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com