agriculture news in marathi No consumer for imported Urud | Agrowon

आयात उडदाला ग्राहक मिळेना 

वृत्तसेवा
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र सरकारने आयातीला घातलेल्या पायघड्या आणि साठा मर्यादेमुळे बाजार दबावात होता. सध्या स्थानिक आणि म्यानमारमधून आयात केलेल्या उडदाला मागणी कमी आहे.

पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र सरकारने आयातीला घातलेल्या पायघड्या आणि साठा मर्यादेमुळे बाजार दबावात होता. सध्या स्थानिक आणि म्यानमारमधून आयात केलेल्या उडदाला मागणी कमी आहे. त्यामुळे आयात उडीद खर्चापेक्षा १०० ते २०० रुपयांनी कमी दरात देण्याची तयारी दर्शविल्यानंतरही मागणी नसल्याचे जाणकारांनी सांगितले. सरकारच्या निर्णयाने सुरुवातीला शेतकरी आणि आयातदारही अडचणीत आल्याची चर्चा सध्या बाजारात सुरू आहे. 

देशातील शेतकऱ्यांचा उडीद बाजारात येण्याच्या आधीच जून महिन्यात केंद्र सरकारने म्यानमारमधून प्रत्येक वर्षी अडीच लाख टन याप्रमाणे पुढील पाच वर्षांत साडेबारा लाख टन उडीद आयातीला परवानगी दिली होती. कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरतेचा नारा देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता आयातीला पायघड्या घातल्या. सोबतच कडधान्यावर साठा मर्यादाही लादली. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारात कमी दर मिळाला. बाजार दबावातच राहिला. उडीद पिकाचे नुकसान होऊन उत्पादन कमी झाल्यानंतरही दर हमीभावाच्या जवळपास होते. आयातदारांनीही मोठ्या प्रमाणात उडीद आयात होऊन त्याचा दबाव देशांतर्गत बाजारावर आला. परिणामी, दर दबावातच राहिले. म्हणून आयातदारांनाही आता दरासाठी झगडावे लागत आहे. त्यांना अपेक्षेपेक्षा कमी दरात उडीद विकावा लागत आहे. 

देशांतर्गत बाजारात सध्या उडदाची मागणी आणि दर स्थिर आहेत. त्यामुळे उडीद आयातदार अडचणीत सापडले आहेत. बाजारात उडदाचे दर हमीभावाच्या दरम्यान आहेत. तर देशात अनेक ठिकाणी दर हमीभावाच्याही खाली होते. आयात होणाऱ्या मालामुळे देशांतर्गत दरावर दबाव निर्माण झाला होता. देशातील उडीद दबावात राहिल्यानंतर त्याचा थेट परिणाम आयात होणाऱ्या उडदावरही होत आहे. 

देशातील आयातदारांनी म्यानमारमधून उडीद आयातीचे मोठे सौदे केले. तसेच उडदाची येथून नियमित आयात होत आहे. आयात उडीद मोठ्या प्रमाणात चेन्नई येथील बंदरावर दाखल होत असून, येथे खरेदीदारांचा अभाव जाणवत आहे. सणासुदीच्या काळातही कडधान्याला मागणी नसल्याने बाजार सुस्त आहे. मोठी तेजी-मंदी नसल्याने व्यापारी हात राखूनच व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामुळे आयातदारांना कमी दरात माल विकावा लागत आहे. देशांतर्गत उडदाच्या दरामुळे आयात सौदे फसल्याने रोख रकमेचाही सामना आयातदारांना करावा लागत असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

बंदरावर जहाजातून उडीद उतरवणेही कठीण होत आहे. त्यामुळे आयातदार आयात खर्चापेक्षा १०० ते २०० रुपये कमी दराने माल विकण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कडधान्याच्या दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. यंदा देशांतर्गत उडीद उत्पादनात प्रतिकूल हवामानामुळे घट आली होती. मात्र हंगामातील माल बाजारात लगेच दाखल झाला. तसेच निर्यातदार म्यानमारमध्ये उडदाची मागणी कमी होती. परिणामी, येथून निर्यात होत आहे. लग्नसराईच्या दिवसांत उडदाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. 

उडीद बाजारातील स्थिती 

  • देशातील उत्पादन हाती येण्याच्या आधीच आयातीला परवानगी 
  • देशांतर्गत उत्पादनात घट येऊनही दर दबावात 
  • अनेक ठिकाणी दर हमीभावाच्या खाली 
  • दर हमीभावाच्या जवळपास असताना आयात वाढली 
  • आयात मालामुळे दरावर दबाव 
  • बंदरावरील मालाला खरेदीदार मिळेना 

प्रतिक्रिया 
म्यानमारमधून उडदाची आयात नियमित होत आहे. आधीच देशांतर्गत दर दबावात होते. त्यातच आयात मालामुळे दरवाढीला ब्रेक लागला. त्यातच स्थानिक मालही हमीभावाच्या दरम्यान मिळत असल्याने आयात मालाचा उठाव कमी होत आहे. त्यामुळे आयात खर्चाच्या तुलनेत १०० ते २०० रुपयांपर्यंत स्वस्त माल देऊनही ग्राहक मिळत नाही. 
- राहुल चौहान, शेतीमाल बाजार विश्‍लेषक, नवी दिल्ली 


इतर अॅग्रोमनी
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
शेतमालाची निर्यात गाठणार ५० अब्ज...२०२२ या आर्थिक वर्षात भारतीय शेतमाल निर्यात (...
सोयाबीनः सावध, ऐका पुढल्या हाका जगाची लोकसंख्या २०५० साली १० अब्ज...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
कापूस वायदा सरकारी रडारवरदेशात ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत एकंदर नऊ कृषी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
cotton market: पांढरं सोनं उद्योगाच्या... पुणे ः कापसाचे दर वाढल्याची हाकाटी पिटत कापड...
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १...देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट...
हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडेनागपूर : लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
साखर उत्पादनाची शतकी मजलकोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू...
हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवरकमी मागणी, आयातीमुळे हरभरा दर दबावात पुणे -...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
देशातील तूर उत्पादनात मोठी घटपुणे : देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग,...
खर्चात बचत हाच नफ्याचा पायानांदेड शहरापासून ३० किलोमीटरवरील दापशेड (ता. लोहा...
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...