agriculture news in Marathi no death record of farmer from agitation Maharashtra | Agrowon

आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची नोंद नाही : कृषिमंत्री तोमर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद शासनाकडे नाही, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नुकतीच लोकसभेत दिली. 

केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाना आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी मागील आठ महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांमधून २०० शेतकरी जंतर मंतर येथे सरकारची परवानगी घेऊन आंदोलन करत आहेत. 

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे २०२० पासून किती मृत्यू झाले याची सरकारला माहिती आहे का, असे विचारल्यावर कृषिमंत्री तोमर म्हणाले, की आंदोलनात शेतकऱ्यांचे किती मृत्यू झाले याची नोंद सरकारकडे नाही. तसेच कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनातील भीतीचे कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात आला नाही. 

‘‘शेतकरी संघटनांशी चर्चा करताना कडाक्याची थंडी आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुले आणि वयस्क व्यक्तींना, विशेषतः महिलांना आंदोलनातून घरी जाऊ द्यावे, असे आवाहन केंद्राने केले होते. कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सरकारने अनेकदा प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दल सरकार गंभीर आणि संवेदनशील आहे,’’ असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

कृषिमंत्री पुढे म्हणाले, की आंदोलनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये ११ बैठका झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीशिवाय त्यांना कायद्यांतील कोणत्या तरतुदींविषयी अडचणी आहेत त्यावर चर्चा करावी, यावर सरकारने बैठकांमध्ये भर दिला. शेतकऱ्यांनी कोणत्या तरतुदींबद्दल आक्षेप आहे, त्यावर चर्चा करावी, जणेकरून त्यांची शंका दूर करणे आणि त्या तरतुदीत बदल करणे सरकारला शक्य होईल. मात्र शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर आडून बसले आहेत. 

समितीचा अहवाल सादर 
सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये शेवटची बैठक २२ जानेवारीला झाली. मात्र २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारामुळे चर्चा थांबली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि कृषी कायद्यांच्या अभ्यासासाठी समिती स्थापन केली. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे, असेही कृषिमंत्री तोमर म्हणाले. 


इतर अॅग्रो विशेष
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...