सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही

सांगली जिल्हा बँक जागावाटपावर महविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने एकत्रीत येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेसच्या पदरात किती जाणार येणार याबाबत अद्यापही निश्‍चितता नसून, जागावाटपावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसना अशी एकत्र येणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसते आहे. जागावाटपासाठी तिन्हीही पक्ष बैठकांवर बैठका घेऊ लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी आघाडातील जागावाटपावर प्राथमिक बैठक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी १२, काँग्रेस ७, तर शिवसेनेला दोन जागा असा फॉर्म्यूला समोर आला होता. बहुतांश या पद्धतीने जागा देण्याबाबत तत्वतः मान्यताही देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला सात जागा हव्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन अधिक जागा मागण्याचा विचार केला. तर काँग्रेसला आणखी एक जागा हवी होती. त्यावर दोन्ही पक्ष ठाम होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी एक पाऊल मागे घेत काँग्रेस व शिवसेना यांच्यात पुन्हा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला ८, शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादीला १० अशा जागा देण्याचा विचार सुरू झाला आहे. तर स्वीकृतमध्ये राष्ट्रवादीला जागा हवी आहे. परंतू शिवसेनेने चार जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. तर काँग्रेसला एक वाढीव जागा मिळाली तर स्वीकृतीची जागेचा आग्रह सोडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अजुनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. परिणामी, कोणत्या पक्षाला किती जाणा मिळणार हे येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com