agriculture news in marathi No decision in seat sharing in Sangli DCC election by Mahavikas Aghadi | Page 4 ||| Agrowon

सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास आघाडीचे एकमत नाही

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

सांगली जिल्हा बँक जागावाटपावर महविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने एकत्रीत येऊन महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शिवसेना आणि काँग्रेसच्या पदरात किती जाणार येणार याबाबत अद्यापही निश्‍चितता नसून, जागावाटपावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसना अशी एकत्र येणार असल्याचे सध्यातरी चित्र दिसते आहे. जागावाटपासाठी तिन्हीही पक्ष बैठकांवर बैठका घेऊ लागले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी आघाडातील जागावाटपावर प्राथमिक बैठक झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी १२, काँग्रेस ७, तर शिवसेनेला दोन जागा असा फॉर्म्यूला समोर आला होता.

बहुतांश या पद्धतीने जागा देण्याबाबत तत्वतः मान्यताही देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला सात जागा हव्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन अधिक जागा मागण्याचा विचार केला. तर काँग्रेसला आणखी एक जागा हवी होती. त्यावर दोन्ही पक्ष ठाम होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी एक पाऊल मागे घेत काँग्रेस व शिवसेना यांच्यात पुन्हा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला ८, शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादीला १० अशा जागा देण्याचा विचार सुरू झाला आहे. तर स्वीकृतमध्ये राष्ट्रवादीला जागा हवी आहे. परंतू शिवसेनेने चार जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. तर काँग्रेसला एक वाढीव जागा मिळाली तर स्वीकृतीची जागेचा आग्रह सोडला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अजुनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. परिणामी, कोणत्या पक्षाला किती जाणा मिळणार हे येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होईल.


इतर ताज्या घडामोडी
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...