आमचा निर्णय अद्याप झालेला नाही ः खोतकर

आमचा निर्णय अद्याप झालेला नाही ः खोतकर
आमचा निर्णय अद्याप झालेला नाही ः खोतकर

जालना : लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा निर्धार कायम असून, मी अजूनही बाजूला झालेलो नाही. आमचा निर्णय अजून व्हायचा बाकी असून, तो मुंबई होणार आहे, अशा शब्दांत अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली नसल्याचे रविवारी (ता. १०) पुन्हा एकदा स्‍पष्ट केले.     जालना शहरातील ऐतिहासिक लोखंडी पुलाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि खोतकर पुन्हा एका मंचावर आले. तसेच दोघांनी सोबत बसून या पुलाचे भूमिपूजन केले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर आदी उपस्थित होते.  आमचा विषय मात्र अजूनही पेंडिंग आहे, असे म्हणत दादा मला संधी द्या, नाहीतर तुम्ही मला म्हणा मी संधी देतो. अशी साद घालत दोघातच उमेदवारीचा पेच सोडवण्याचा मुद्दा खोतकरांनी खासदार दानवे यांच्या समोर मांडला. तसेच आमचा निर्णय अजून होणे बाकी असून, तो मुंबईत होणार आहे, असे सांगत मी अजूनही बाजूला झालेलो नाही, असे पुन्हा एकदा खोतकरांनी या वेळी स्‍पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com