कोल्हापुरात रासायनिक खतांची मागणी घटली

कोल्हापुरात रासायनिक खतांची मागणी घटली
कोल्हापुरात रासायनिक खतांची मागणी घटली

कोल्हापूर : जिल्ह्यात यूरिया, डीएपी, सुपरफॉस्फेटसह सर्व खतांची गोडाऊन भरलेली आहेत. मात्र, एप्रिल-मे महिन्यात वळीव पावसाने पाठ फिरवल्याने खतांची मागणी घटली. 

जिल्ह्यात या वर्षीसाठी १ लाख ४४ हजार टन खतांचा पुरवठा केला जाणार आहे. यापैकी सध्या ५२ हजार टन खते जिल्ह्यातील सर्व गोडाऊनमध्ये आहेत. गेल्या वर्षी याच दिवसांत ३९ हजार मेट्रिक टन खते होती. आता मात्र ५२ हजार मेट्रिक टन खतांचा साठा आहे. एकीकडे खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दुसरीकडे वळीव पावसाने पाठ फिरवली आहे. या दोन्हीमध्ये खतांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. 

एप्रिल-मे महिन्यात जोरदार वळीव पावसामुळे शेतीसाठी रासायनिक खतांची मागणी असते. उसाची भरणी असो किंवा इतर फळभाज्यांसाठी, तसेच डोंगरावर ९० दिवसांमध्ये येणाऱ्या भातासाठी रासायनिक खतांसह हातमिश्रित खतांचीही मागणी असते. या वर्षी शेतीला पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. याच उन्हात रासायनिक खते दिली तर पिकांना मारक ठरणार होती. त्यामुळे खतांच्या वापराशिवाय केवळ मिळेल तेवढ्या पाण्यावरच पिके जगवावी लागली. याचा परिणाम खतांच्या मागणीवर झाला आहे.

जिल्ह्यात युरिया, डीएपी सुपर फॉस्फेटसह सर्व खतांचा साठा शिल्लक आहे. आजही युरियाची एक रेक आली आहे. खतांची गोडाऊन भरलेली आहेत. आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जोरदार पाऊस झाल्यानंतर खतांच्या मागणीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात १ लाख ४४ हजार टन खतांचा पुरवठा केला जाणार आहे. यापैकी ५२ हजार मेट्रिक टन खत सध्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे खतांची टंचाई भासणार नाही. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ३९ हजार टन खते होती, तर या वर्षी मात्र ५२ हजार टन खते शिल्लक आहेत. - चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद

रासायनिक खतांच्या किमती १४०० ते १५०० पर्यंत गेल्या आहेत. या किमती कमी केल्या पाहिजेत. उत्पान खर्चात वाढ होत असताना त्या तुलनेत कृषीमालाला हमीभाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे. - अविनाश पाटील, वाकरे (ता. करवीर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com