Agriculture news in Marathi 'No entry' to husband who comes to work in political wife's name | Agrowon

पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या पतिराजांना ‘नो एंट्री’ !

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. आरक्षणामुळे कोणी सरपंच, कोणी पोलिस पाटील, तर कोणी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची अध्यक्षाही झाली. मात्र, आजही अनेक ठिकाणी त्यांच्या कारभारात पतीचा तसेच नातेवाइकांचा हस्तक्षेप असल्याचे वारंवार दिसून येते. याला रोखण्यासाठी व पदावर बसलेल्या महिलेलाच स्वतः कारभार चालविण्याची संधी मिळावी, तिचा आत्मविश्‍वास वाढावा, या उद्देशाने बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या पती किंवा नातेवाइकांना कामकाजाच्या उद्देशाने भेटणे बंद करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे.

बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. आरक्षणामुळे कोणी सरपंच, कोणी पोलिस पाटील, तर कोणी पंचायत समिती, जिल्हा परिषदेची अध्यक्षाही झाली. मात्र, आजही अनेक ठिकाणी त्यांच्या कारभारात पतीचा तसेच नातेवाइकांचा हस्तक्षेप असल्याचे वारंवार दिसून येते. याला रोखण्यासाठी व पदावर बसलेल्या महिलेलाच स्वतः कारभार चालविण्याची संधी मिळावी, तिचा आत्मविश्‍वास वाढावा, या उद्देशाने बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या पती किंवा नातेवाइकांना कामकाजाच्या उद्देशाने भेटणे बंद करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. याची अंमलबजावणीही त्यांनी आपल्या कामकाजात सुरू केली आहे.

याबाबत ‘सकाळ-ॲग्रोवन’शी बोलताना सुमन चंद्रा म्हणाल्या, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. याच राज्यातील सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी स्त्री-शिक्षणाची दारे खुली केली. त्यांच्यामुळे आज महिलांना शिक्षण घेता आल्याने वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळाल्या. काही महिला राजकारणात उच्च पदांवर पोचल्या. राजकारणात त्यातही प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाल्याने त्यांचा टक्का वाढला. हे सर्व महिलांबाबत सकारात्मक आहे. परंतु, आजही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदांवर काम करीत असलेल्या महिलांचे पती, तसेच नातेवाइकांचा कामकाजात हस्तक्षेप दिसून येतो. यामुळे महिला पदांवर असल्या, तरी कामकाज चालवितात त्यांचे पती, नातेवाईक. 

जिल्ह्याची प्रमुख म्हणून काम करतानाही अनेकदा महिला पदाधिकाऱ्यांचे पती भेटण्यासाठी येतात. त्यांच्यासोबत महिला असल्या तरी त्यांचे पती प्रश्‍न मांडतात. हा प्रकार आपणास योग्य वाटला नाही. त्यामुळेच यापुढे महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने भेटण्यासाठी येणारे सरपंच पती, सभापती, पोलिस पाटील यांना भेटणे बंद केले आहे. यामागे उद्देश स्पष्ट आहे. महिलांना पद मिळाले असेल, तर ते तिने चालविण्याचे धाडस केले पाहिजे. ती एकदा, दोनदा, तिनदा चुकेल. मात्र, या चुकांमधून शिकेल आणि तिचे नेतृत्व घडेल. वारंवार अयशस्वी झाली तरी ती उभी राहील.

कमी शिकलेल्या किंवा काहीही न शिकलेल्या महिला पदांवर पोचतात. परंतु, त्यांना कामकाज येणार नाही असे नाही. कारण बरेच पुरुष पदाधिकारीही अशिक्षित, कमी शिकलेले असतात. असे असतानाही ते पुढे येऊन कामकाज चालवितात. त्यामुळे मग महिलांना याच कारणाने मागे ठेवण्याचे कुठलेही कारण असू शकत नाही, असे आपणास वाटते. त्यामुळेच मी निवडून आलेल्या पत्नीच्या वतीने येणाऱ्या सरपंचपती, सभापतिपती, अध्यक्ष-उपाध्यक्षपतींना भेटणे बंद केले आहे. 
- सुमन चंद्रा, जिल्हाधिकारी, बुलडाणा


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...