केंद्राच्या निधीविना रखडली आंतरजातीय विवाह साह्य योजना

आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसाह्य योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र शासनाकडील हिस्सा येणे बाकी आहे. हा निधी उपलब्ध झाल्यावर प्रलंबित प्रस्ताव मान्य करून दाम्पत्यांना अर्थसाह्य देण्यात येणार आहे. - प्रवीण कोरगंटीवर, समाजकल्याण अधिकारी
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : समाजामध्ये समतेची भावना रुजावी, त्यांच्यात एकात्मता दृढ व्हावी, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अर्थसाह्य ही योजना सुरू केली; परंतु केंद्राच्या निधीचा हिस्सा मिळाला नसल्याने ही योजना रखडली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे दोन वर्षांचे एकूण ५२९ प्रस्ताव यामुळे प्रलंबित राहिले आहेत.

राज्यात २०१० पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला प्रोत्साहनपर अर्थसहाय्य दिले जाते. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध होतो. केंद्राच्या निधीअभावी २०१८-१९ मधील ३६२ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत, तर २०१९-२० मध्ये १६७ प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे आले आहेत. अर्थसाह्याचे वाटप करण्यासाठी राज्य सरकारचा हिस्सा मिळाला असला तरी, मात्र केंद्रांकडून एक कोटी रुपये येणे असल्याने योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसाह्य वितरित करता न आल्याचे समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात या योजनेला दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असून, २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ३५१ दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, ८७ लाख ९० हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले आहे. २०१६-१७ मध्ये २२५ दाम्पत्यांना एकूण ५६ लाख २५ हजार, २०१७-१८ मध्ये २९७ दाम्पत्यांना एकूण ७४ लाख २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले. प्रत्येक दाम्पत्याला ५० हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. त्यामुळे या दाम्पत्यांचे संसार उभे राहिले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com