सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे देखील पूर्ण झाले असून, शेतकरी मदतीची प्रतीक्षा करू लागला आहे.
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसान झालेल्या पिकांसाठी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. त्यानुसार बाधित पिकांचे पंचनामे देखील पूर्ण झाले असून, शेतकरी मदतीची प्रतीक्षा करू लागला आहे.   सांगली जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. ४१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे ३४ हजार १९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूर्वीच्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार ३८ कोटी ३० लाख २१ हजार रुपयांची भरपाई मिळणार होती. शेतकऱ्यांना जिरायती व बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी २५ हजार, अशी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार संबंधित विभागाने पिकांचे पंचनामे तत्काळ सुरू करून एका महिन्यात पंचनामे पूर्ण केले. पंचनामा केलेला अहवाल वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर केली जाणार असे सांगण्यात आले होते. वाळवा आणि आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बांधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई जमा केली आहे. या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई वर्ग केली असली तरी इतर तालुक्यातील पंचनामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंचनामे झाले, आता भरपाई कधी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत. या वर्षी द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागायतदार शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. परंतु अजून कोणत्याही प्रकारचे पंचनामे झाले नाहीत, त्यामुळे सरकारने पंचनामे करून द्राक्षबागयतदारांना मदत द्यावी. - नीलेश साळुंखे, बोरगाव, ता. तासगाव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com