agriculture news in marathi No Government assistance received before Diwali | Agrowon

सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचे पंचनामे देखील पूर्ण झाले असून, शेतकरी मदतीची प्रतीक्षा करू लागला आहे.

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने नुकसान झालेल्या पिकांसाठी आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले. त्यानुसार बाधित पिकांचे पंचनामे देखील पूर्ण झाले असून, शेतकरी मदतीची प्रतीक्षा करू लागला आहे.

  सांगली जिल्ह्यातील जून ते ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी झाली. ४१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे ३४ हजार १९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पूर्वीच्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार ३८ कोटी ३० लाख २१ हजार रुपयांची भरपाई मिळणार होती. शेतकऱ्यांना जिरायती व बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी २५ हजार, अशी मदत जाहीर केली आहे. त्यानुसार संबंधित विभागाने पिकांचे पंचनामे तत्काळ सुरू करून एका महिन्यात पंचनामे पूर्ण केले. पंचनामा केलेला अहवाल वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम खात्यावर केली जाणार असे सांगण्यात आले होते. वाळवा आणि आटपाडी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बांधित झालेल्या पिकांची नुकसान भरपाई जमा केली आहे. या दोन्ही तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई वर्ग केली असली तरी इतर तालुक्यातील पंचनामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंचनामे झाले, आता भरपाई कधी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

या वर्षी द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागायतदार शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. परंतु अजून कोणत्याही प्रकारचे पंचनामे झाले नाहीत, त्यामुळे सरकारने पंचनामे करून द्राक्षबागयतदारांना मदत द्यावी.
- नीलेश साळुंखे, बोरगाव, ता. तासगाव.


इतर बातम्या
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...