agriculture news in marathi, No heavy rain prediction in state | Agrowon

पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. यानंतर ७२ तासांत ते ओमनच्या दिशेने सरकेल. यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता. २२) राज्यातील काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. तर अनेक ठिकाणी ऊन पडल्याने चांगलाच चटका जाणवत होता. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात उकाड्यात वाढ झाली.

पुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. यानंतर ७२ तासांत ते ओमनच्या दिशेने सरकेल. यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता. २२) राज्यातील काही भागांत ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. तर अनेक ठिकाणी ऊन पडल्याने चांगलाच चटका जाणवत होता. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात उकाड्यात वाढ झाली.

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे सोमवार व मंगळवारी काही प्रमाणात हवामान ढगाळ राहणार असून, तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होण्यास काही दिवसाचा कालावधी बाकी असताना राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे. अनेक भागात उन्हाचा चटका वाढत असताना काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहे. यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहेत. रविवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरीत सर्वाधिक ३३.९ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तसेच इतर ठिकाणीही कमाल तापमान सरासरीएवढेच होते. 

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या होता. येवला येथे सर्वाधिक ६९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. विदर्भातील भिवापूर येथे ६० मिलिमीटर पाऊस पडला. तर ब्रह्मपुरी, मूल, गोंदिया, सावळी, कुही, मौदा, पेरसेवनी, करंजलाड, मंगळूरपीर, भंडारा या ठिकाणी पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या असून, मध्य महाराष्ट्रात कोपरगाव येथे ४७ मिलिमीटर पाऊस पडला. पाथर्डी, राहाता, शेवगाव येथेही हलका पाऊस पडला. कोकणातील खेड येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला. तर भिरा, श्रीवर्धन, सुधागडपाली अशा तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला.  

रविवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत हवामान विभाग) :   

  • कोकण ः भिरा २५, मुरूड १२, श्रीवर्धन ३२, सुधागडपाली १९, खेड ३४, रत्नागिरी १४.५, सावंतवाडी १३, वैभववाडी १२, वेंगुर्ला १३.२ 
  • मध्य महाराष्ट्र ः कोपरगाव ४७, पाथर्डी १०, राहाता ११, शेवगाव १०, जामनेर १८, गिरणा धरण ३४, येवला ६९ 
  • मराठवाडा ः जळकोट १२ 
  • विदर्भ ः बाळापूर १२.२, बार्शीटाकळी १७.८, पातूर १९.६, चांदूर ११.४, भंडारा २०, लाखंदूर १९.४, लाखनी १५.६, मोहाडी १५.६,
  • तुमसर १३.२, खामगाव १७.६, ब्रह्मपुरी ४४.२, चिमूर १५.५, गोंडपिंप्री १८.१, कोपर्णा १२.९, मूल २३.६, नागभीर ३५.२, सावळी २२, 
  • शिंदेवाही १९.६, अरमोरी ३३, चार्मोशी १२.५, देसाईगंज १२, आमगाव १०.३, देवरी १५, गोंदिया २०.६, सडकअर्जुनी २२.७, तिरोरा १०.८, भिवापूर ६०, कामटी १३, कुही ३४,४, मौदा ३५.४, पेरसेवनी ४५, रामटेक १३.६, करंजलाड २६.६, मंगळूरपीर २१.९, बाभुळगाव १४.२ 

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...