Agriculture news in marathi No increase in BG-2 price of cotton: Agriculture Minister Bhuse | Page 2 ||| Agrowon

कापसाच्या बीजी-२ची दरवाढ नको ः कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

केंद्र शासनाने या वर्षी अधिसूचना जारी करून बीजी-२ वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये, अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज येथे सांगितले. 

मुंबई : केंद्र शासनाने या वर्षी अधिसूचना जारी करून बीजी-२ वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये, अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज येथे सांगितले. 

कापूस बियाण्यांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच राज्यातील बीटी कापसाचे क्षेत्र मोठे असल्याचे लक्षात घेऊन बोंड अळी नियंत्रणाबरोबरच कापूस पिकासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना रुजवण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी या वेळी केले. खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर आज मंत्रालयात श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बीटी कापूस बियाणे पुरवठा व त्याच्या दराच्या अनुषंगाने बैठक झाली. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, कृषी विभागाचे अधिकारी व बियाणे उत्पादक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या वेळी श्री. भुसे यांनी सांगितले, की केंद्र शासनाने या वर्षी अधिसूचना जारी करून बीजी-२ वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये, अशी विनंती केंद्र शासनाला करणार आहोत. राज्यात गेल्या दोन, तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी विभाग व कापूस बियाणे कंपन्यांनी जिल्हानिहाय समन्वय ठेवून बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

जिल्हानिहाय व कंपनीनिहाय बोंड अळी नियंत्रण मोहीम आयोजित करीत असताना ‘एक गाव एक वाण’ या संकल्पनेवर भर द्यावा, त्यातून मिळणाऱ्या कापूस गाठी या एकसारख्या असतात, त्यांचे जिनिंग करणे सोपे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव बाजारभाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे बोंड अळी नियंत्रणाबरोबरच ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना रुजवण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले. 

खरीप हंगामात एकूण वहितीखालील क्षेत्रापैकी कापूस हे राज्याचे महत्त्वाचे नगदी पीक असून मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र या पिकाखाली असल्याने कृषी विभागाने विशेष पुढाकार घेऊन या पिकातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करावा. मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर देण्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. 

‘वेचणी तंत्राचा अभ्यास करावा’ 
राज्यभरात व राष्ट्रीय पातळीवर कापूस पिकाची वेचणी सुलभ होण्याकरिता वेगवेगळी यंत्रे विकसित होत असून, त्याची यशस्विता तपासावी. त्याचबरोबर गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ‘मेटिंग डिस्ट्रप्शन’ तंत्रज्ञानाचा देखील सविस्तर अभ्यास कृषी विद्यापीठांनी करावा, असेही कषिमंत्री भुसे यांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी...पुणे ः राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर...
साहेब, टरबूज विक्रीला परवानगी द्या अकोला ः दरवर्षी रमजान महिन्यात टरबुजाला चांगली...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
कांदाकोंडी टाळणेच योग्य पुणेः कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात...
मंत्री साहेब, कोटींच नुकसान होईल हो ! नाशिक: जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी...
साखर निर्यातीचा यंदा विक्रम? कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा...
अन्न प्रक्रियेमध्ये अवरक्त किरणांचा वापरअन्न प्रक्रियेदरम्यान पारंपरिक उष्णतेच्या...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...