Agriculture news in Marathi No information was received about fruit crop insurance sanction in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची माहिती मिळेना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 डिसेंबर 2021

जिल्ह्यातील चार हजार ८८० शेतकऱ्यांनी भाग घेऊन कंपनीकडे शेतकरी व शासनाचा एकूण ४५ कोटी १४ लाखांचा विमा हप्ता भरला. यानंतर हा विमा मंजूर किंवा नामंजूर झाला याबाबत कंपनीकडून माहिती मिळत नसल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. 

नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील ३३ मंडळांत लागू केली होती. यात जिल्ह्यातील चार हजार ८८० शेतकऱ्यांनी भाग घेऊन कंपनीकडे शेतकरी व शासनाचा एकूण ४५ कोटी १४ लाखांचा विमा हप्ता भरला. यानंतर हा विमा मंजूर किंवा नामंजूर झाला याबाबत कंपनीकडून माहिती मिळत नसल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. 

यामुळे शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. मागील वर्षी नांदेडमध्ये केळी, आंबा व मोसंबी या फळपिकासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केला होता. यात केळी व मोसंबीसाठी ता. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत तर आंबा फळपिकासाठी गुरुवारपर्यंत ता. १५ नोव्हेंबर २०२० मुदत होती. यात जिल्ह्यातील अधिसूचित मंडळातील चार हजार ८८० शेतकऱ्यांनी भाग घेऊन दोन कोटी २५ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर राज्य शासनाने तीन कोटी एक लाख व केंद्र शासनाने दोन कोटी ८९ लाख असा एकूण आठ कोटी १६ लाख रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला होता. यात ४५ कोटी १४ लाख ८२ हजार संरक्षित रक्कम निश्‍चित केली होती. दरम्यान, विमा मंजुरीचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना विम्याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. 

याबाबत भनगी येथील शेतकरी प्रभाकर मोरे यांनी विमा कंपनीने मागील वर्षीचा केळीचा विमा भरला होता. परंतु याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने यंदा विमा कसा भरावा, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तर कृषी विभागाकडे संपर्क केला असता आम्ही कंपनीकडे माहितीसंदर्भात मेल केला, परंतु कंपनीकडून अद्याप माहिती मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

या मंडळांतील शेतकऱ्यांनी भरला फळपीक विमा
जिल्ह्यात आंबिया बहरात केळीसाठी तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी (ता. नांदेड). अर्धापूर, दाभड, मालेगाव (ता. अर्धापूर), मुदखेड, मुगट, बारड (ता. मुदखेड). शेवडी बा. (ता. लोहा). हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी (ता. हदगाव). भोकर (ता. भोकर). मरखेल व हाणेगाव (ता. देगलूर). उमरी (ता. उमरी). बरबडा (ता. नायगाव). आंबा : कंधार (ता. कंधार). मुक्रमाबाद (ता. मुखेड). दाभड (ता. अर्धापूर) मोसंबीसाठी आंबिया बहरात मालेगाव (ता. अर्धापूर). लिंबगाव (ता. नांदेड) या तालुक्याचा समावेश होता. तर मोसंबीसाठी मृग बहारात पिंपरखेड (ता. हदगाव), जाहूर (ता. मुखेड) व लिंबगाव (ता. नांदेड) या मंडळांचा समावेश होता.


इतर अॅग्रो विशेष
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...