यंदाही पोळा सणाला मूग, उडदाची साथ नाही

यंदाही पोळा सणाला मूग, उडदाची साथ नाही
यंदाही पोळा सणाला मूग, उडदाची साथ नाही

अमरावती : यंदाही निसर्गाने साथ दिली नसल्याने पोळा सण तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना सण साजरा करावा कसा? असा प्रश्‍न पडला आहे.  पहिल्या सणाला मूग व उडदाचे पीक विक्रीसाठी बाजारात येत होते. गेल्या सहा सात वर्षांपासून निसर्गाच्या चुकलेल्या चक्रामुळे हे पीक दसऱ्याच्या आसपास विकायला बाजारात येऊ लागले आहे. त्यातही उत्पादनाची सरासरी घसरली आहे. खरीप हंगामातील पहिले व नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारे मूग व उडीद यावर शेतकऱ्यांचा पोळा सण साजरा केल्या जातो. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा व महत्त्वाचा सण यंदाही अडणीचा ठरू लागला आहे. पावसाळा उशिरा आल्याने मूग व उडदाची पेरणी लांबली. जिल्ह्यात एका ठरावीक पट्ट्यात या पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. यंदा पेरणी क्षेत्र कमालीचे घसरले आहे. पावसाचा फटका या पिकांना बसला आहे. येथील बाजार समितीचा आवक अहवाल बघितल्यास अजूनही मूग व उडदाची आवक झालेली नाही. गतवर्षीचे सोयाबीन, तूर व हरभरा मात्र अजूनही येत आहे. मूग व उडदाची आवक नसली तरी बाजारात भाव बऱ्यापैकी खुलले आहेत. मूगाला ६ हजार, तर उडदास चार हजारपर्यंत भाव आहे. आवकच नसल्याने खेरदीदारांनी केवळ भाव जाहीर केलेत. मुगाच्या शेंगा सद्य:स्थितीत परिपक्वतेकडे वळल्या आहेत. कोवळ्या शेंगा बाजारात विकायला आल्या आहेत. भाजी विक्रेत्यांच्या गाडीवर त्या विकायला आहेत. पूर्ण परिपक्व होऊन त्या बाजार समितीत विक्रीस येण्यास अजून महिनाभराचा वेळ लागणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना पोळा उधारीवर साजरा करण्याची वेळ आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com